नवी दिल्ली : नागरिकांकडे असणे अत्यंत आवश्यक असून हे कार्ड आयकर विभागाकडून पॅन कार्ड जारी केले जाते, यात एक १० अंकी युनिक क्रमांक असतो. ज्यामध्ये तुमचे सर्व वैयक्तिक तपशील दिले जातात. पण अनेक वेळा पॅनकार्ड बनवताना तांत्रिक बिघाडामुळे लोकांचा फोटो खराब होतो किंवा अस्पष्ट होतो. तुमचाही Pan कार्डवरील फोटो स्पष्ट नसेल तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण, आता तुम्ही ते अगदी सहजपणे अपडेट करू शकत. जाणून घेऊया पॅन कार्डवरील फोटो बदलण्याची संपूर्ण प्रक्रिया. वाचा: फॉलो करा या स्टेप्स : तुमच्या पॅन कार्डचा फोटो बदलण्यासाठी तुम्हाला प्रथम NDLS च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्हाला Apply Online आणि Registered User असे दोन पर्याय दिसतील. आता तुम्हाला अर्जाच्या प्रकारावर जाऊन तुम्हाला नवीन पॅनकार्ड घ्यायचे आहे की पॅनकार्ड बदलायचे आहे ते निवडावे लागेल. जर तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्हाला विद्यमान पॅन डेटा पर्यायामध्ये बदल आणि सुधारणा निवडावी लागेल. त्यानंतर वैयक्तिक पर्याय निवडा. तुम्हाला विनंती केलेली माहिती योग्यरित्या भरावी लागेल. आता तुम्हाला कॅप्चा कोड भरावा लागेल आणि सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर तुम्हाला KYC साठी तुमचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर लगेचच तुम्हाला फोटो मिसमॅच आणि सिग्नेचर मिसमॅच असे दोन पर्याय दिसतील. आता फोटोमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला फोटो मिसमॅचचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती भरावी लागेल आणि पुढील पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला यूजर्सच्या ओळखीच्या पुराव्यासह इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. डिक्लरेशनवर टिक केल्यानंतर लगेच सबमिट बटणावर क्लिक करा. या प्रक्रियेसाठी भारतातील रहिवाशांसाठी १०१ रुपये आणि भारताबाहेरील पत्त्यांसाठी १०११ रुपये शुल्क आहे. शेवटी तुम्हाला १५ अंकी एक्नॉलेजमेंट नंबर मिळेल. यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची प्रिंट आउट इन्कम टॅक्स पॅन सर्व्हिस युनिटला पाठवावी लागेल. तुम्ही या एक्नॉलेजमेंट नंबरसह तुमचा अर्ज देखील ट्रॅक करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rApKaH