नवी दिल्ली : टॅक्सशी संबंधित काम असो अथवा बँकेशी संबंधित, एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. पॅन कार्ड नंबरमध्ये व्यक्तीच्या टॅक्स आणि गुंतवणुकीसंबंधित डेटा असतो. मात्र, पॅन कार्ड हरवल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. अशा स्थितीमध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता. वाचा: ई-पॅन कार्डला तुम्ही डिजिटल अथवा ऑनलाइन पॅन कार्ड देखील म्हणू शकता. हे पॅन कार्डचे एक व्हर्च्यूअल व्हर्जन आहे. ई-पॅन कार्ड फिजिकल कॉपीपेक्षा अधिक चांगले आहे. ई-पॅन कार्ड हरवण्याची चिंता नसते. तसेच, गरज असल्यास याचा व्हेरिफिकेशनसाठी वापर करता येतो. विशेष म्हणजे, ई-पॅन कार्डला तुम्ही मिनिटात डाउनलोड करू शकता. असे डाउनलोड करा card
- सर्वात प्रथम आयकर विभागाची वेबसाइटवर दिलेल्या डाउनलोड ई-पॅन पर्यायावर जा.
- यासाठी https://ift.tt/3klER1W लिंक वापरू शकता.
- येथे तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकावा लागेल.
- पुढे आधार नंबर टाका.
- आता जन्मतारीख टाका. त्यानंतर नियम व अटींचा स्विकार करावा लागेल.
- आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल. तुम्हाला ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- त्यानंतर तुम्ही UPI, डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ८.२६ रुपये शुल्क द्यावे लागेल.
- पेमेंट केल्यानंतर तुम्ही ई-पॅन कार्ड डाउनलोड करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xW3kBM