मुंबई- आणि कतरिना कैफच्या लग्नाची बातमी कव्हर करण्यासाठी अनेक छायाचित्रकार सध्या त्यांच्या घराबाहेरच जमले आहेत. दरम्यान, विकीचे वडील यांनी छायाचित्रकारांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सध्या बी-टाउनमध्ये कतरिना आणि विकीच्या लग्नाचीच चर्चा आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची बातमी मीडियात आल्यापासून या दोघांच्या घराबाहेर मीडिया फोटोग्राफर्सची गर्दी पाहायला मिळते. विकी किंवा कतरिनाच्या घरच्यांकडूनही या लग्नाबद्दल आतापर्यंत काहीही बोलण्यात आलं नसलं तरी या दोघांच्या घरात सुरू असलेली तयारी फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटलेली नाही. ई-टाइम्सचे छायाचित्रकारही सध्या विकीच्या घराबाहेर आहेत. दरम्यान, त्यांनी सांगितले की विकीच्या घरूनच त्यांच्या सर्वांच्या जेवणाची सोय करण्यात येत आहे. ही सोय विकीचे वडील शाम कौशल यांनी केल्याचं त्यांनी सांगितले. आमच्या छायाचित्रकाराने सांगितलं की, विकीचा भाऊ सनी कौशल त्याचे वडील शाम त्यांच्या ड्रायव्हरसह खाली आले आणि घराबाहेर उभ्या असलेल्या छायाचित्रकारांना जेवण दिले. विकी कौशल आणि ९ डिसेंबरला राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे लग्नबंधनात अडकणार आहेत. या लग्नात बाहेरच्या कोणत्याही फोटोग्राफरला फोटो काढण्याची किंवा व्हिडिओ काढण्याची परवानगी नाही. या लग्नाला येणारे पाहुणेही विकी आणि कतरिनाचे फोटो काढू शकणार नाहीत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3y1oI8L