मुंबई : 'बिग बॉस १५' कार्यक्रमात जेव्हा कार्तिक आर्यन सहभागी झाला होता तेव्हा त्याला सलमानने विचारले होते की, 'मला सुट्ट्या कुठे घालवायला आवडतात?' यावेळी सलमानने त्याला पर्यायही दिले होते. परंतु कार्तिकने सांगितले की, सलमानला पनवेलच्या फार्महाऊसमध्ये सुट्ट्या घालवायला आवडतात. सलमानने देखील कार्तिकने सांगितलेली गोष्ट मान्य केली. सलमानने हे कबूल केले की पनवेलमधील फार्महाऊस शिवाय त्याला कोणतेही जागा आवडत नाही. मुंबईतील धावपळीतून विसावा हवा असेल तर सलमान पनवेलच्या फार्महाऊसवर जातो. लॉकडाऊनमध्ये फार्महाऊसमध्ये शेती आणि गाण्याचे रेकॉर्डिंग गेल्यावर्षीचा संपूर्ण लॉकडाऊन सलमानने त्याच्या याच फार्महाऊसमध्ये घालवला होता. तिथे त्याने शेती केली, शेतामध्ये ट्रॅक्टर चालवला इतकेच नाही तर बिग बॉस १४ च्या प्रोमोचे चित्रीकरण देखील केले. तसेच त्याने तीन-चार गाण्यांचे चित्रीकरण देखील इथेच केले आणि ती गाणी रिलीजही केली. बहिणीच्या नावाने फार्महाऊस सलमान खानने पनवेल येथील फार्महाऊसला त्याच्या बहिणीचे अर्पिताचे नाव दिले आहे. अर्पिता फार्म हाऊस १५० एकरवर पसरले आहे. त्यामध्ये जिम, प्रायव्हेट पूलसह अनेक सोयीसुविधा आहेत. रिसॉर्टमध्ये पूल आणि जिम फार्म हाऊसमध्ये असलेले पूल रिसॉर्ट स्टाईलचा आहे. तिथे जिमसह सर्व सोयीसुविधा आहेत. सलमान खान 'बिईंद स्ट्राँग्ज फिटनेस इक्वप्मेंट' आणि 'एसके२७ जीम' फ्रँजाईसचा मालक आहे. त्यामुळे अर्थातच त्याच्या जीममध्ये देखील ही इक्विप्मेंट लावली आहेत. फार्म हाऊसमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा पनवेल येथील या फार्महाऊसमधील सर्व रूममध्ये आलिशान सोयीसुविधा आहेत. एक आलिशान लिविंग रूम आहे, तिथून बाहेरचा खूप सुंदर व्ह्यू दिसतो. परंतु या सोयीसुविधांपेक्षा सलमानला या फार्महाऊसमधील नसैर्गिक सौंदर्य जास्त आवडते. त्यात तो अधिक रमतो. फार्महाऊसमध्ये आहे आलिशान बंगला पनवेलमधील फार्म हाऊसमध्ये एक आलिशान बंगला देखील आहे. गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सलमान त्याच्या मित्रांसोबत तिथेच राहिला होता. यावेळी त्याच्यासोबत युलिया वंतूर,सोहेल खान देखील तिथे होते. तिथे राहून सलमान फार्महाऊसची साफ-सफाई केली. त्याचे व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. घोड्यांसाठी खास तबेला सलमानच्या या फॉर्महाऊसमधील नैसर्गिक वातावरण कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. या ठिकाणी सलमानने घोडे आणि इतर अनेक प्राणी आहेत. घोड्यांसाठी खास तबेला ही येथे बांधलेला आहे. सलमान येथे घोडेस्वारी करत असतो. त्याचे फोटो देखील त्याने लॉकडाऊमध्ये सोशल मीडियावर शेअर केले होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HbJ828