नवी दिल्ली: ने भारतात Elfin स्मार्ट प्रोजेक्टर लाँच केले असून या प्रोजेक्टरचे वजन १ किलोपेक्षा कमी आहे. त्याचा वीज वापर कमी आहे. हा प्रोजेक्टर हाय-एंड वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे, चांगली ऑडिओ गुणवत्ता, मोठी स्क्रीन आणि उच्च रिझोल्यूशन, 3D व्ह्यू, एलईडी-शक्तीची बॅटरी मिळते. प्रोजेक्टरचे स्मार्ट स्क्रीन अॅडॉपटेशन टेक्नॉलॉजी युजर्सना चित्रपट पाहताना किंवा त्यांचे आवडते शो स्ट्रीम करताना थिएटरसारखा अनुभव घेण्यास सक्षम करते. या प्रोजेक्टरमध्ये डोळ्यांच्या सुरक्षेसाठीही एक फीचर आहे. वाचा: XGIMI Halo Plus किंमत आणि उपलब्धता: किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, XGIMI Halo Plus बाजारात मर्यादित कालावधीसाठी ९९,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. त्याच वेळी, त्याची किंमत नंतर १,०५,९९९ रुपये असेल. या प्रोजेक्टरची मूळ एमआरपी १,२५,००० रुपये आहे. डिव्हाइस ई-कॉमर्स साइट Amazon आणि XGIMI च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. XGIMI Halo Plus : स्पेसिफिकेशन XGIMI Halo Plus मध्ये १०८० FHD रिझोल्यूशनसह DLP सिनेमा-ग्रेड २००-इंच डिस्प्ले आहे. यात ड्युअल ५ W हरमन कार्डन स्पीकर आहेत जे स्वच्छ ऑडिओ प्रदान करतात. या प्रोजेक्टरमध्ये बिल्ट इन क्रोमकास्ट आहे. Device Android TV 10.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून XGIMI Halo Plus कीस्टोन करेक्शन एलाइंगमेंट द्वारे समर्थित आहे. यासोबतच, यामध्ये इंटेलिजेंट स्क्रीन अॅडॅपटेशन (ISA) तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे, जे ऑटो-फोकसिंगमध्ये मदत करते. प्रोजेक्टर ऑब्स्टेकल एवाइड तंत्रज्ञानाचा वापर करतो, ज्यामुळे खोलीच्या आत कुठेही चांगले पाहता येते . बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर, या प्रोजेक्टरमध्ये ५९ W बॅटरी आहे जी एक्सटेंडेड प्ले टाइम देते. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर या प्रोजेक्टरमध्ये हेडफोन्स, USB 2.0 आणि HDMI 2.0 पोर्ट्स देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lswHqw