नवी दिल्ली : हँडसेट उत्पादक Realme ने आपल्या बजेट स्मार्टफोन च्या किमती पुन्हा एकदा वाढवल्या आहेत. जर तुम्ही देखील हा Realme मोबाईल फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर खरेदी करण्यापूर्वी या हँडसेटची किंमत आधी किती होती आणि आता हा स्मार्टफोन घेण्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील ते जाणून घ्या. वाचा: Realme C11 2021 ची भारतात किंमत: हा Realme स्मार्टफोन जूनमध्ये ६,९९९ रुपये (२ GB व्हेरिएंट) च्या किमतीत लाँच करण्यात आला होता, तर ४ GB रॅम व्हेरिएंट ८,४९९ रुपये किंमतीत लाँच करण्यात आले होते. परंतु, नंतर या हँडसेटची किंमत वाढली आणि २ GB व्हेरिएंटची ७२०० रुपये करण्यात आली. त्याच वेळी, ४ GB रॅम व्हेरिएंट ८७९९ रुपयांना विकले जाऊ लागले. आता पुन्हा एकदा Realme C11 2021 च्या किमती वाढल्या आहेत आणि आता २ GB रॅम व्हेरिएंटची किंमत ७४९९ रुपये आहे, तर ४ GB रॅम व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला ८,९९९ रुपये मोजावे लागतील. म्हणजेच दोन्ही व्हेरियंटच्या किमतीत २०० रुपयांनी वाढ झाली आहे. Realme C11 2021 स्पेसिफिकेशन्स: सॉफ्टवेअरबद्दल बोलायचे झाले तर, हा Realme मोबाइल फोन Android 11 वर आधारित Realme UI २.० वर चालतो. डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, या हँडसेटमध्ये तुम्हाला ६.५ -इंचाचा HD+ डिस्प्ले मिळेल, ज्याचे रिझोल्यूशन ७२० x१६०० पिक्सेल आहे. फोन ८९.५ टक्के स्क्रीन टू बॉडी रेशो आणि २०:९ आस्पेक्ट रेशो सह येतो. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी या बजेट स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर वापरण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी बॅक पॅनलवर ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ५-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये वाय-फाय, 4G एलटीई, जीपीएस-ए-जीपीएस, ब्लूटूथ, ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि मायक्रो-यूएसबी पोर्ट सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी वायर्ड रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3olHfti