मुंबई- मराठी सिनेसृष्टीतली नावाजलेली अभिनेत्री सायली संजीवच्या वडिलांचं निधन झालं. स्वतः सायलीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला सायलीच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू होते. वडिलांच्या मृत्यूची बातमी देताना सायली त्यांच्यासोबतचे अनेक फोटो शेअर केले. यासोबतच तिने लिहिले की, 'संजीव २६/७/१९५८ - ३०/११/२०२१. तुला माहीत आहे नं बाबा माझं तुझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम होतं, आहे आणि कायम असेल. या जगात सगळ्यात जास्त तू आयुष्य आहेस माझं.' यानंतर सायलीने वेन्टिलेटर सिनेमातील बाबा गाण्यातील काही ओळीही लिहिल्या. सायलीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनी तर कमेन्ट केल्याच. शिवाय सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनीही कमेन्ट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला. मयुरी देशमुख, सुबोध भावे यांनी भावपूर्व श्रद्धांजली दिली. तर इतर कलाकारांनीही तिचं सांत्वन केलं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xSlgNK