Full Width(True/False)

Smartphone Offers: फक्त ३४९ रुपयांमध्ये मिळतोय जबरदस्त बॅटरी बॅकअप असलेला 'हा' स्मार्टफोन, पाहा ऑफर्स

नवी दिल्ली: Amazon वेळो-वेळी सेलचे आयोजन करतच असते, जिथे ग्राहकांना स्मार्टफोन अतिशय स्वस्तात खरेदी करता येतात. पण , सेल सुरु नसतानाही अनेक स्मार्टफोनवर चांगल्या डील त्यावर उपलब्ध असतात . असे अनेक स्मार्टफोन्स आहेत ज्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. जर तुम्ही मजबूत बॅटरी असलेला स्मार्टफोन शोधत असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर ही योग्य संधी आहे. वर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. ऑफर मिळवून, तुम्ही फोन फक्त ३४९ रुपयांमध्ये घरी आणू शकता. वाचा: Tecno Spark 7T ऑफर : Tecno Spark 7T च्या ४ GB RAM + ६४ GB स्टोरेज वेरिएंटची लाँच किंमत १०,९९० आहे. पण, Amazon वर त्यावर २० % सूट आहे. म्हणजेच हा फोन ८,७९९ रुपयांना उपलब्ध आहे. इतकेच नाही. बँक ऑफर आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेता आला तर, हा फोन याहून अधिक स्वस्तात खरेदी करता येईल. Tecno Spark 7T वर बँक ऑफर: सिटी युनियन बँकेच्या डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १५० रुपयांची इन्स्टंट सूट मिळेल. म्हणजेच फोनची किंमत ८,६४९ रुपये असेल. एक्सचेंज ऑफर किंमत आणखी कमी करेल. Tecno Spark 7T वर एक्सचेंज ऑफर Tecno Spark 7T वर ८,३०० रुपयांची एक्सचेंज ऑफर आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज केला तर तुम्हाला खूप सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या फोनची स्थिती चांगली असेल आणि मॉडेल नवीन असेल तरच तुम्हाला ८,३०० रुपयांपर्यंत सूट मिळेल. अशा प्रकारे जर तुम्ही तुम्ही फुल ऑफ मिळविला तर तुम्हाला Tecno Spark 7T ३४९ रुपयांत खरेदी करता येईल. Tecno Spark 7T : स्पेसिफिकेशन्स Tecno Spark 7T मध्ये ६.५२ -इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, सोबत MediaTek Helio G35 चिपसेट आणि ४८ MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप शक्तिशाली ६००० mAH बॅटरीसह आहे. वाचा: वाचा: वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GjQosH