नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच खासगी टेलिकॉम कंपन्या , आणि ने प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. मात्र, मोबाइल यूजर्सची चिंता अधिक वाढणार आहे. लवकरच कंपन्या पोस्टपेड प्लान्सच्या किंमती देखील वाढवण्याची शक्यता आहे. फायनेंशियल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एमर्जिंग मार्केट्स टेक्नोलॉजी, मीडिया एंड एंटरटेनमेंट एंड टेलिकॉम्यूनिकेशन्स लीडर EY, प्रशांत सिंघल यांनी माहिती दिली की, प्रीपेडनंतर आता पोस्टपेड प्लान्सच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. वाचा: रिपोर्टनुसार, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया टॅरिफमध्ये वाढ करू शकतात. इतर देशांच्या तुलनेत भारतात टॅरिफ सर्वात स्वस्त असून, आता प्रीपेड प्लान्सचे दर वाढल्याने देखील महाग होऊ शकतात. विशेष म्हणजे पोस्टपेड ग्राहकांवर किंमतीत वाढ झाल्याने जास्त प्रभाव पडणार नाही. किंमती वाढल्यानंतर देखील ते आपले प्लान्स कायम ठेवतात. टेलिकॉम कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, एव्हरेज रेवेन्यू पर यूजर (ARPU) वाढवण्यासाठी प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. प्रीपेड प्लान्सचे दर वाढवल्याने ARPU मदत मिळेल, तर पोस्टपेड प्लान्समुळे कंपनीचा अधिक फायदा होईल. खासकरून वोडाफोन-आयडियाला याची सर्वाधिक गरज आहे. सध्या वोडाफोन आयडियाचा ARPU १०९ रुपये, एअरटेलचा १५३ रुपये आणि रिलायन्स जिओचा १४३.६ रुपये आहे. भारतात टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हाइडर्सला संपूर्ण भारतात मोबाइल नेटवर्क उभारण्यासाठी लाखो-कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतील. यात स्पेक्ट्रमसाठीचा खर्च, चांगल्या सर्व्हिससाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंट, थकबाकी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अनेक खर्चांचा समावेश आहे. असे असतानाही भारतात स्वस्त टेलिकॉम सर्व्हिस असल्याने कंपन्यांना मर्यादित उत्पन्न मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3lCEp1p