नवी दिल्ली: भारतात वरील लोकांचे फॉलोअर्स कमी होत असून युजर्स सतत त्यांचे फॉलोअर्स कमी करण्याबद्दल ट्विट करत आहेत. काही युजर्सचे तर काही मिनिटांत १०० पेक्षा जास्त फॉलोअर्स गमावले आहेत. तर, काहींचे म्हणणे आहे की अचानक हजारो फॉलोअर्स कमी झाले आहेत. मात्र, अद्याप यावर ट्विटरकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. प्लॅटफॉम क्लीनअप केले जात असून यामध्ये, बॉट्स आणि निष्क्रिय खाती निलंबित केली जात आहेत. वाचा: बॉट्सपासून सुटका मिळविण्यासाठी वेळोवेळी असे करतात. यामध्ये ते यूजर्सचे पासवर्ड आणि डिटेल्सची पडताळणी करतात. असे केल्याने बनावट खाते काढून टाकण्यास मदत होते. ट्विटरने या वर्षी पुन्हा एकदा असे केले होते . त्यावेळी युजर्सच्या फॉलोअर्समध्ये लक्षणीय घट झाली होती. जूनमध्ये बॉलीवूड अभिनेता अनुपम खैर यांनी ट्विट केले होते की, त्यांचे ८०,००० फॉलोअर्स कमी झाले आहेत. त्यानंतर ट्विटरने म्हटले होते की, ज्या युजर्सना स्पॅममध्ये टाकले गेले आहे आणि त्यांचे पासवर्ड किंवा फोन नंबर कन्फर्म होत पर्यंत त्यांच्या फॉलोअर्सची संख्या काउंट होणार नाही. विशेष म्हणजे, Twitter चे नवे सीईओ पराग अग्रवालही यातून सुटू शकले नाहीत. ट्विटरवर त्यांचे ३६०.३ k फॉलोअर्स होते, त्यापैकी ४३.७ k फॉलोअर्स कमी झाले आहेत. ट्विटरवर लोकांचे फॉलोअर्स कमी होत असल्यामुळे युजर्स नवीन सीईओला ट्विटरवर टॅग करून याबद्दल तक्रार करत आहेत. वैयक्तिक माहिती सुरक्षा धोरणात बदल: Twitter ने १ डिसेंबरपासून आपल्या वैयक्तिक माहिती सुरक्षा धोरणात बदल केले आहेत. ट्विटरने युजर्सना फोटो आणि व्हिडिओ सारख्या मीडिया फाइल्स खाजगीत शेअर करण्यावर बंदी घातली होती. आता परवानगीशिवाय कोणीही युजरला मीडिया फाइल्स पाठवू शकणर नाही. याशिवाय ट्विटरने घराचा पत्ता, ओळखपत्रे आणि संपर्क माहिती यासारखी संवेदनशील माहिती असलेल्या मीडिया फाइल्सवर बंदी घातली आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3G8py6z