संजना पाटील मालिकांमधील मुख्य भूमिका करणारे कलाकार प्रेक्षकांच्या लक्षात राहतातच. पण सहायक व्यक्तिरेखा साकारणारे कलाकारही लोकप्रिय असतात. त्यांच्या कामाचं कौतुक केलं जातं. अशीच एक अभिनेत्री म्हणजे . '' या मालिकेत अम्मा ही भूमिका साकारणाऱ्या अशा ज्ञाते घराघरांत पोहोचल्या आहेत. त्याची भूमिका घरकाम करणाऱ्या महिलेची आहे. कर्नाटकी भाषेत बोलणारी अम्मा प्रेक्षकांना जवळची वाटते. गौरी या मुख्य पत्राबरोबरचं असलेलं अम्माचं नातं प्रेक्षकांना मायलेकीचं नातं वाटतं. शाळा, कॉलेज असताना त्यांनी कधीच रंगभूमीवर काम केलं नव्हतं. परंतु कामगार कल्याण केंद्रातून त्यांच्या अभिनयप्रवासाला सुरुवात झाली. नाटक-एकांकिकांचं दिग्दर्शन त्या करू लागल्या आणि अभिनय क्षेत्रात उतरल्या. १९९९ साली त्यांनी अभिनयाचा शुभारंभ केला. त्यानंतर २००० साली 'हे रामा आत्मारामा' या नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यांच्या त्या भूमिकेचं आणि नाटकाचंही खूप कौतुक झालं. त्यानंतर 'नारी झाल्या भारी', 'आमचं सगळं सातमाजली' अशी अनेक नाटकं त्यांनी केली आणि रंगभूमीवर त्या स्थिरावल्या. 'आजपर्यंत इतक्या भूमिका केल्या परंतु अम्मानं मला खरी ओळख दिली. प्रवास करताना लोक थांबवून विचारतात की तुम्हीच त्या अम्मा ना? तेव्हा खूप समाधान वाटतं. मला अभिनयाची आवड खूप आधीपासून होती. एक एक पाऊल टाकत गेले आणि नवनवीन भूमिकादेखील मिळत गेल्या. घरच्यांनी मला सहकार्य केलं म्हणून इथपर्यंत पोहोचू शकले', असं आशा सांगतात. आविष्कारमधून त्यांनी नाट्यशास्त्राचं प्रशिक्षणदेखील घेतलं आहे. आशा यांच्या अभ्यासू वृत्तीमुळेच त्या अभिनयात वैविध्यपूर्ण काम करू शकल्या. संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. संतोष यांच्याकडून खूप शिकले असं त्या आवर्जून सांगतात. सध्या त्या साकारत असलेली अम्मा प्रेक्षकांच्या जवळची झाली आहे. त्यांच्या सहज अभिनयामुळे त्यांनी प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलंसं केलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xXBCEY