Full Width(True/False)

Twitter: सीईओ पदाची सूत्रे हाती घेताच पराग अग्रवाल यांनी बदलली Photo-Video शेयरिंग पॉलिसी, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : पराग अग्रवाल यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर Action मध्ये असल्याचे दिसत आहे. ट्विटरच्या माहितीनुसार आता इतर युजर्स ट्विटर खातेधारकाच्या परवानगीशिवाय खाजगी फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकणार नाहीत. यासाठी ट्विटरने आपले नेटवर्क धोरण अधिक कठोर केले आहे. आगामी काळात ट्विटर आपल्या दुसऱ्या धोरणातही मोठे बदल करू शकते, अशी अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. वाचा: ट्विटर युजर्स आवाहन करू शकतील: ट्विटरच्या नवीन धोरणानुसार, आता युजर्स कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ त्याच्या परवानगीशिवाय शेअर करू शकणार नाहीत. असे करणे एखाद्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन करत असल्याचे ट्विटरचे म्हणणे आहे. यामुळे त्याला भावनिक आणि शारीरिक नुकसान देखील होऊ शकते. याशिवाय, इंटरनेट युजर्सना अपील करण्याचा पूर्ण अधिकार असेल, असे ट्विटरने स्पष्ट केले आहे. म्हणजेच युजर्स त्यांचे खाजगी फोटो आणि व्हिडिओ काढून टाकण्याचे आवाहन करू शकतात. ट्विटरने कोणाचा पत्ता, आयडी पुरावा, संपर्क तपशील किंवा आर्थिक माहिती शेअर करण्यावर आधीच बंदी घातली आहे. पराग अग्रवाल सीईओ बनताच आणला हा नवीन नियम: ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतरचा आणि कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल यांची सीईओ म्हणून नियुक्ती झाल्यानतंरचा हा बदल आहे. पराग अग्रवाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एका दिवसात ट्विटरसाठी नवीन नियम लागू केले आहे. सार्वजनिक व्यक्तींना नियम लागू होणार नाहीत: ट्विटरचे बहुतेक नियम सार्वजनिक व्यक्तींना लागू होणार नाहीत. ट्विटर नुसार सामान्य युजर्सचे फोटो आणि व्हिडिओ परवानगीशिवाय शेअर केल्याने लोकांच्या गोपनीयतेला हानी पोहोचते. नियम लागू करण्यामागचा उद्देश छळविरोधी धोरणांना अधिक मजबूत करणे आणि महिला युजर्सना सुरक्षित ठेवणे हा आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pkaxrq