'सिटी ऑफ ड्रिम्स'च्या पहिल्या सीझनमध्ये अभिनेत्री प्रिया बापटच्या लेस्बियन किसिंग सीनची जोरदार चर्चा झाली. एका मराठी अभिनेत्रीनं दिलेल्या बोल्ड दृश्यामुळं प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या सीनबद्दल ती म्हणाली होती की, 'मला वाटतं की या दृश्याची मर्यादा ही त्या सीरिजपुरतीच आहे आणि ते तिथंच ठेवलं पाहिजे. आपण त्या गोष्टीला खूप प्रकाशझोतात आणायला नको. त्या वेबसीरिजमध्ये माझं आणखीही काम आहे आणि ते खूप वेगळं आहे. माझं काम फक्त त्या एका मिनिटापुरतं नाही. लोकांनी ते एवढं संकुचित करू नये. एखादं काम करताना आपण ते कोणाबरोबर करतोय, त्याची निर्मिती संस्था कोणती, दिग्दर्शक कोण आहे ते कसं दाखवलं जाणार, कोणत्या गोष्टीचा भाग आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टींकडं काणाडोळा करून फक्त एका बोल्ड दृश्याबाबत बोललं जात असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. कथेमधल्या एखाद्या दृश्यावरून तुम्ही त्या व्यक्तीच्या चारित्र्यावर जाऊ नका. आजकाल ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोक जगभरातलं काम बघतात. कोणत्याही भारतीय किंवा मराठी मुलीनं ते केलं म्हणून त्यावर बोलू नका. कलाकाराच्या कामाचा भाग म्हणून तुम्ही त्याकडे बघा.'
from Marathi Movies Serials News; Bollywood News in Marathi | Entertainment News https://ift.tt/rv3EAoY