नवी दिल्ली : हँडसेट उत्पादक Infinix आपले नवीन स्मार्टफोन आणि Infinix Note 11S भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. कंपनीने लाँचची तारीख जाहीर केली असून हे दोन्ही स्मार्टफोन भारतात १३ डिसेंबर रोजी लाँच केले जातील. कंपनीने ऑक्टोबरमध्ये Infinix Note 11 ग्लोबल मार्केटमध्ये लाँच केला होता आणि काही काळानंतर कंपनीने हे देखील घोषित केले की हे डीव्हाईस भारतीय बाजारात देखील लाँच करण्यात येईल. नोव्हेंबरमध्ये कंपनीने आपल्या Infinix Note 11 सीरीज अंतर्गत एक नवीन स्मार्टफोन Infinix Note 11S देखील लाँच केला होता. वाचा: Infinix Note 11 : ड्युअल-सिम सपोर्ट असलेल्या या Infinix स्मार्टफोनमध्ये ६.७ -इंचाचा फुल HD प्लस AMOLED डिस्प्ले आहे. फोन १८० Hz टच सॅम्पलिंग रेट आणि २०:९ आस्पेक्ट रेशो सह येतो. संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ वापरण्यात आला आहे. MediaTek Helio G88 प्रोसेसर स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी वापरण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी तीन रियर कॅमेरे, २ मेगापिक्सेल डेप्थसह ५० मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि AI कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. ३३ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Infinix Note 11S : या Infinix मोबाईलमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.९५ इंच फुल एचडी प्लस IPS LCD डिस्प्ले आहे जो १८० Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. MediaTek Helio G96 चिपसेट वेग आणि मल्टीटास्किंगसाठी वापरण्यात आला आहे. मागील पॅनलवर ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ५० मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा, २ मेगापिक्सेल डेप्थ आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस १६-मेगापिक्सलचा सेन्सर आहे. फोनमध्ये ५००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी, ३३ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pwrwHc