नवी दिल्ली : जगभरातील कोट्यावधी लोक चॅटिंगसाठी प्रामुख्याने चा वापर करतात. चॅटिंगपासून ते महत्त्वाच्या फाइल्स, व्हिडिओ पाठवण्यासाठी WhatsApp चा उपयोग होतो. अॅपच्या माध्यमातून मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. वाचा: अनेकदा आपल्याला अनोळखी लोकांना लोकेशन अथवा इतर माहिती WhatsApp च्या माध्यमातून पाठवायची असते. अशा वेळेस आपण त्यांचा नंबर सेव्ह करतो. मात्र, तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून सहज नंबर सेव्ह न करता मेसेज करू शकता. नंबर सेव्ह न करता असा करू शकता WhatsApp मेसेज
- सर्वात प्रथम फोनवर वेब ब्राउजर ओपन करा.
- त्यानंतर https://ift.tt/39XqWZ3 या लिंकला एड्रेस बारमध्ये पेस्ट करा.
- xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोड टाकून कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा.
- आता फोनमध्ये एंटर बटनवर क्लिक करा.
- त्यानंतर फोनच्या स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर हिरव्या रंगाचे मेसेज बटन दिसेल.
- त्यावर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हॉट्सअॅप ओपन होईल.
- येथून तुम्ही त्या व्यक्तीला थेट मेसेज करू शकता.
- जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास, त्या नंबरला सेव्ह न करता मेसेज पाठवायचा असल्यास रीसेट कॉलमध्ये जाऊन आय बटनवर क्लिक करा.
- आता व्हिडिओ कॉल पर्यायावर टॅप करून व्हॉट्सअॅप निवडा.
- व्हिडिओ कॉल लागल्यानंतर त्वरित कट करा.
- आता व्हॉट्सअॅपवर जा.
- येथे उजव्या बाजूला असलेल्या आय बटनवर टॅप करून मेसेज आयकॉनवर क्लिक करा.
- आता नंबर सेव्ह न करता त्या व्यक्तीला मेसेज करू शकता.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dk8NJk