नवी दिल्ली: बाजारात फोल्डेबल फोनची संख्या वाढत असून Samsung पासून Huawei पर्यंत अनेक कंपन्यांनी फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. अशात, Huawei लवकरच आणखी एक फोल्डेबल फोन लाँच करू शकते. Huawei कंपनीने काही काळापूर्वी फोल्डेबल स्मार्टफोन Huawei Mate X लाँच केला होता. आता असे म्हटले जात आहे की, कंपनी याशिवाय फ्लिप फोन डिझाइनचा फोन देखील सादर करू शकते. त्याचे नाव असू शकते. लीक्सनुसार हा फोन २३ डिसेंबरला लाँच होऊ शकतो. वाचा: Huawei Mate V स्पेसिफिकेशन्स: Huawei Mate V चे काही डिटेल्स लीक झाले आहेत. हा फ्लिप फोल्डेबल फोन असेल. हा फोन बाजारात लाँच केल्यानंतर, सध्याच्या Samsung Galaxy Z Flip3 आणि Z Fold3 ला टक्कर देऊ शकतो. फोल्डिंग यंत्रणा आणि हीटिंग केसेसबद्दल अजूनही चिंता आहेत आणि यामुळेच ग्राहक फोल्डेबल फोन घेणे टाळतात. विशेष म्हणजे, या चिंता दूर करण्यासाठी Huawei Mate V काही नवीन तंत्रज्ञान आणू शकते. हा आगामी फ्लिप फोन अधिक चांगल्या डिझाइनसह सादर केला जाऊ शकतो. एका अहवालानुसार, Huawei Mate V चे पेटंट फोटोज देखील समोर आले आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, अनोखी हीट पाईप डिझाइन २०२० मध्ये Huawei ने पेटंट केली होती. पेटंट फोल्ड करण्यायोग्य स्मार्टफोनच्या लांबीपर्यंत लवचिक हीट पाईप दाखवते. अशाप्रकारे, पाइपिंग सिस्टम उष्णता व्यवस्थापनामध्ये लक्षणीय सुधारणा प्रदान केली जाऊ शकते. परंतु, हे सर्व फक्त लीक्स असून जोपर्यंत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही तोपर्यंत या फोनबद्दल काहीही बोलणे योग्य ठरणार नाही. वाचा: वाचा वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rAcAup