Full Width(True/False)

राजपूत की गुर्जर! अक्षयच्या 'पृथ्वीराज' वर अजमेरमध्ये राडा

मुंबई- अभिनेता याचा पृथ्वीराज चौहान हा चित्रपट अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. २१ जानेवारी २०२२ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार आणि माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत असणार आहेत. परंतु आता चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात गुर्जर समाजातील लोकांनी चित्रपटाविरोधात आंदोलन केलं असून चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तो आंदोलनकर्त्यांना दाखवा अशी मागणी त्यांनी केली आहे. अक्षय कुमारने जेव्हा पासून पृथ्वीराज या चित्रपटाची घोषणा केली आहे तेव्हापासून या चित्रपटा संदर्भात अनेकदा वाद निर्माण झाला. याआधी चित्रपटाच्या नावावरून ही वाद झाला होता. परंतु आता थेट गुर्जर समाजाने अजमेर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चित्रपटा विरोधात आंदोलन केलं. पृथ्वीराज चौहान हे गुर्जर समाजाचे होते, त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याआधी तो आमच्या नेत्यांना दाखवा अशी त्यांनी मागणी केली. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाने आंदोलनकर्त्यांनी अजमेर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिलं. यासोबतच चित्रपटावर बंदी घालवी अशीही मागणी करण्यात आली आहे. पृथ्वीराज चित्रपटाविरोधात अजमेर जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोठ्या संख्यने गुर्जर समाज एकत्र झाला होता. गुर्जर समाजातील आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, पृथ्वीराज चौहान हे राजपूत नसून गुर्जर आहेत त्यामुळे चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदर गुर्जर समाजातील नेत्यांना दाखवावा आणि त्यांनी होकार दिल्यानंतरच हा चित्रपट रिलीज करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, २१ जानेवारी २०२२ रोजी पृथ्वीराज रिलीज होणार असून चित्रपटात चौहान यांची भूमिका साकारणार आहे तर मानुषी छिल्लर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता संजय दत्त आणि सोनू सूद यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. मात्र वाढत्या करोना रुग्ण संख्येमुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3FKWItj