मुंबई-ओटीटीच्या चाहत्यांसाठी या आठवड्याला मनोरंजनाचा नवीन डोस येत आहे. यात तुम्हाला अॅक्शन, थ्रिलर, प्रेम आणि भरपूर ड्रामा अशा सर्व गोष्टी पाहायला मिळतील. करोना काळाआधी प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊन सिनेमे पाहायचे. मात्र आता प्रेक्षकांचा ओढा ओटीटीकडे जास्त वाहत गेलेला दिसतो. करोना काळात ओटीटी हे मनोरंजनाच केंद्रबिंदू झालं. या आठवड्यात कपिल शर्माचा '' हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवार आणखी कोणते शो, सीरिज आणि सिनेमे ओटीटीवर रिलीज होणार आहेत ते पाहूयात.. द सिनर - नेटफ्लिक्स ज्यांना मनोवैज्ञानिक रहस्य पाहायला आवडत असेल त्यांच्यासाठी, द सिनर ओटीटीवर प्रदर्शित झाला. मागील तीन सिझनना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सीरिजचा चौथा सिझन आज २७ जानेवारी रोजी गुरुवारी नेटफ्लिक्सवर पाहू शकतात. कपिल शर्मा- आय एम नॉट डन येट - नेटफ्लिक्स कपिल शर्मचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित कॉमेडी शो 'आय एम नॉट डन येट' या आठवड्याला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा शो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून यात तो त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर प्रसंगही सांगताना दिसेल. शोमध्ये स्टँड-अप कॉमेडी करून प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. ऑल ऑफ असं आर डेड- नेटफ्लिक्स तुम्हाला २८ जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर 'ऑल ऑफ अस डेड' ही सीरिज पाहायला मिळेल. हा या सीरिजचा पहिला सिझन आहे. यामध्ये एका शाळेत झोम्बी व्हायरसची कथा दाखवण्यात आली आहे. ही एक थ्रिलर वेबसीरिज आहे. पवित्र रिश्ता २.०- झी ५ अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची अतिशय लोकप्रिय मालिका 'पवित्र रिश्ता'चा दुसरा सिझन या आठवड्यात २८ जानेवारी रोजी झी ५ वर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेत पुन्हा एकदा मानव आणि अर्चनाची प्रेम कथा दाखवण्यात येणार आहे. - डिझनी प्लस हॉटस्टार बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीने २०२१ मध्ये 'तडप' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 'तडप' आता डिझनी प्लस हॉटस्टार वर २८ जानेवारीला म्हणजेच या शुक्रवारपासून पाहू शकाल. 'तडप' हा एक रोमँटिक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये तारा सुतारिया मुख्य भूमिकेत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u11obd