मुंबई : बॉलिवूड तसेच हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि अमेरिकन पॉप गायक निक जोनास यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली. दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं की सरोगसी तंत्रज्ञानाद्वारे दोघं आई-वडील झाले. या पोस्टमध्ये त्यांना मुलगा झाला आहे की मुलगी याचा मात्र त्यांनी खुलासा केला नव्हता. परंतु मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार प्रियांका चोप्राच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. 'डेली मेल' या न्यूज पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार प्रियांका आणि निक यांना सरोगसीद्वारे मुलगी झाली आहे. त्यांची ही मुलगी १२ आठवडे आधीच जन्माला आली. अर्थात या वृत्ताला प्रियांका अथवा निक यांनी दुजोरा दिलेला नाही. 'डेली मेल' ने त्यांच्या सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार लिहिले की, निक आणि प्रियांका यांची मुलगी २७ व्या आठवड्यात जन्माला आली. नवजात बाळ आणि तिची सरोगेट आई कॅलिफोर्नियामधील एका इस्पितळात आहेत. या महिलेची ही पाचवी सरोगसी आहे. प्रियांका आणि निकच्या मुलीचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता. परंतु या मुलीचा जन्म आधीच झाला असून त्या दोघीही इस्पितळात आहेत. मीडिया रिपोर्टनुसार प्रियांका आणि निक गेल्या काही महिन्यांपासून बाळाचं प्लॅनिंग करत होते. परंतु दोघांच्या व्यग्र दिनक्रमानुसार त्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे या दोघांनी सरोगसीद्वारे पालक होण्याचा निर्णय घेतला. प्रियांका आणि निक यांनी सरोगेट आईची पूर्णपणे काळजी घेतली होती. शुक्रवारी रात्री २९ वर्षांचा निक आणि ३९ वर्षांची प्रियांका यांनी ते पालक झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर केलं. दोघांनी तशी सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'आम्ही सरोगसीद्वारे आई-वडील झालो आहोत. आमच्यासाठी हा काळ महत्त्वाचा आहे. आम्हाला आता पूर्ण लक्ष कुटुंबाकडे द्यायचं आहे. त्यामुळे आम्ही आमचे खासगीपण जपू इच्छितो.' या पोस्टमध्ये दांपत्याने त्यांना मुलगा झाला की मुलगी याचा उल्लेख केलेला नाही. प्रियांका आणि निक एकीकडे त्यांच्या फॅमिल प्लॅनिंगवर लक्ष देत होते. तर दुसरीकडे त्या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्याही सातत्याने समोर येत होत्या. त्यावरून होणारी चर्चा थांबवण्यासाठी प्रियांकाने सोशल मीडियावर पोस्ट करत त्या दोघांमध्ये सारे काही आलबेल असल्याचं सांगितलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32oaMKG