मुंबई: सोशल मीडियावर विविधांगी भूमिका घेतल्यानं अभिनेते यांना '' या मालिकेतून काढण्यात आलं आहे. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. याविषयी कलाकारांनी तसंच नेतेमंडळींना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 'सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारणं हा माझा देशाचा नागरिक म्हणून अधिकार आहे. तसं असताना माझ्या मालिकेच्या निर्मात्यांकडे माझ्या व्यक्त होण्याबाबत तक्रार आली. हे कारण पुढे करुन मला मालिकेतून वगळण्यात आलं आहे. व्यक्त होणं हा संविधानानं दिलेला अधिकार आहे. तसंच हक्कानं काम करणं हाही माझा अधिकार आहे', असं स्पष्ट मत किरण माने यांनी मांडलं आहे. यानंतर वाहिनी आणि निर्मात्यांकडून कोणतंही अधिकृत माहिती देण्यात आली नसली तरी, किरण मानेंना मालिकेतून काढल्यानंतर नवीन मालिकेचं नवीन पोस्टर लॉन्च करण्यात आलं होतं. आता किरन मानेंनी मालिकेच्या निर्मिती संस्थेवर (प्रोडक्शन हाऊसवर) गंभीर आरोप केले आहेत. प्रोडक्शन हाऊसकडून आता मोठं कारस्थान रचलं जात असल्याचं त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मीडियाचे प्रतिनिधी आज मालिकेच्या सेटवर जाणार आहे. पण अनेक कलाकारांना माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली जातेय. त्यांना पण माझ्यासारखं काढून टाकण्यात येईल, त्यामुळं ते देखील घाबरलेत. चार एक जणं संघविचारी माझ्या विरोधात बोलत आहेत. ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते सत्य सांगतीलचं, असं किरण माने यांनी म्हटलं आहे. वाचा किरण माने यांची संपूर्ण पोस्ट: कलाकारांचा पाठिंबा अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर व्यक्त होत या घटनेचा निषेध नोंदवलाच शिवाय आपण किरण मानेंच्या पाठीशी असल्याचेही म्हटले आहे. किरण मानेंचे व्यक्त होणे न पटून किंवा तक्रारींवरून त्यांना मालिकेतून काढून टाकले असेल, तर ते अन्यायकारच आहे, असे मत दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी व्यक्त केले आहे. कोणतीही राजकीय भूमिका घेणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊ शकतो. पण हक्काचे काम काढून घेणे ही दडपशाही आहे, असे मत विद्वांस यांनी सोशल मीडियावर मांडले आहे. अभिनेत्री अनिता दाते-केळकर यांनीही या घटनेचा निषेध नोंदवला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3numgnm