Full Width(True/False)

मौनी रॉय अडकणार विवाहबंधनात; तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल हे माहित्येय का?

मुंबई: 'नागिन' मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. मोनी लवकरंच लग्न बंधनात अडकणार आहे. मौनी, बॉयफ्रेंड सूरज नांबियार सोबत २७ जानेवारीला २०२२ ला लग्न करणार आहे. मात्र मौनीचा होणारा नवरा सूरज आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सूरज नांबियारचा जन्म कर्नाटकमधील बंगलोर येथील जैन कुटुंबात झाला. त्याचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल शाळेत झाले आहे. २००८ मध्ये त्याने बंगळुरुच्या आरव्ही इंजिनीअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीरिंग पूर्ण केलं. त्याला एक लहान भाऊ आहे ,जो पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक आहे. सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे. सूरज सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते आणि त्याच्या प्रोफाइल फोटोकडे बघता त्याला फिरण्याची आवड असल्याचे समजते. अशी सुरू झाली सूरज आणि मौनी रॉयची प्रेमकथा सूरज नांबियारसोबत मौनी रॉयची पहिली भेट दुबईत झाली होती. काही काळानंतर दोघेही डेट करू लागले. जरी त्यांनी कधीही त्यांच्या नात्याची पुष्टी केली नाही, तरीही त्यांना अनेकवेळा पार्ट्यांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दरम्यान मार्च महिन्यात, ती सूरजच्या कुटूंबियांना जवळची मैत्रीण मंदिरा बेदीच्या घरी भेटली. त्यानंतर ते दोघं लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. अस म्हटलं जात आहे की ते दोघं २७ जानेवारी २०२२ रोजी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. कुठे होणार लग्न? मौनी रॉय सूरज नांबियारसोबत गोव्यात लग्न करणार आहे. त्यांचा विवाह २७ जानेवारीला होणार आहे, तर त्यांचा संगीत आणि हळदी समारंभ २६ जानेवारीला पार पडेल. मात्र करोनाने पुन्हा मान वर काढली असल्याने फक्त जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34ZYeKF