Full Width(True/False)

लता मंगेशकर यांना करोनाची लागण, आयसीयूमध्ये केलं भरती

मुंबई- देशात पुन्हा एकदा कोनाचे रुग्ण वाढत आहेत. अलीकडे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनाही करोनाची लागण झाली आहे. या यादीत आता दिग्गज गायिका यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. ज्येष्ठ गायिका पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याला करोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंडी इस्पितळात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना वयोमानानुसार समस्या आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची भाची रचना यांनी कुटुंबाला प्रायव्हसी देण्यास सांगितले तसेच लता दीदींसाठी देवाकडे प्रार्थना करण्याचीही विनंती त्यांनी केली. दरम्यान, यापूर्वी, लता दीदी यांना नोव्हेंबर २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने इस्पितळात दाखल करण्यात आले होते. २०१९ मध्ये श्वासोच्छवासाचा झाला होता त्रास मिळालेल्या माहितीनुसार, ९२ वर्षीय लता दीदी यांना २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात श्वास घेण्यास त्रास झाला होता. त्यानंतरही त्यांना इस्पितळात दाखल करावं लागलं होतं. मात्र, प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना काही दिवसांत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळीही देश कोविडशी लढा देत होता. सोशल मीडियावर अॅक्टिव राहतात लता दीदी लता मंगेशकर यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांचा ९२ वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला. लता दीदी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्या अनेकदा चाहत्यांसाठी जुने फोटो आणि मनोरंजक किस्से शेअर करताना दिसतात. लता मंगेशकर यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अनेक सेलिब्रिटी आहेत करोना पॉझिटिव्ह करोना व्हायरसने देशात पुन्हा आपलं रौद्र रुप दाखवायला सुरुवात केली आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या करोना पॉझिटिव्ह असून त्यांना घरात क्वारन्टीन करण्यात आले आहे. यात हृतिक रोशनची पूर्वाश्रमिची पत्नी सुजान खान, जॉन अब्राहम, प्रेम चोप्रा, नोरा फतेही, एकता कपूर, दृष्टी धामी यांच्यासह अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tk5VoS