नवी दिल्ली : वनप्लसच्या नॉर्ड सीरिजमधील गेल्या काही दिवसांपासून विशेष चर्चेत आहेत. गेल्या काही महिन्यात स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा असेच एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी स्मार्टफोनचा स्फोट झाला आहे. दुश्यंत गोस्वामी नावाच्या एका ट्विटर यूजरने काही फोटो शेअर करत नॉर्ड सीई समार्टफोनमध्ये आग लागल्याचा दावा केला आहे. वाचा: रिपोर्टनुसार, युजरने जवळपास ६ महिन्यांपूर्वी फोन खरेदी केला होता. फोनला पॉकेटमधून बाहेर काढत असताना अचानक स्फोट झाला आहे. यूजरने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्याकडे लोकप्रिय ब्रँड वनप्लसचा फोन आहे, जे बेस्ट क्वालिटीचा दावा करतात. माझा फोन केवळ ६ महिना जुना असून, काल खिश्यातून काढत असताना अचानक त्याचा स्फोट झाला. हे चुकीचे असण्यासोबतच धोकादायक देखील आहे. कंपनी या घटनेसाठी जबाबदार आहे का?’ यूजरने घटनेची माहिती देत काही फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये स्मार्टफोनची पुढील व मागील बाजू आगीमुळे खराब झाल्याचे दिसत आहे. डिव्हाइसचे सर्वच पार्ट्स जसे की, बॅटरी, डिस्प्ले, कॅमेरा पूर्णपणे खराब झाले आहेत. कंपनीने मात्र अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्टनुसार, ट्विटरसह गोस्वामी यंनी लिंक्डइनवर देखील पोस्ट करत या घटनेची माहिती दिली होती. मात्र, घटनेशी संबंधित पोस्टला आता हटवले आहे. त्यांचा दावा आहे की वनप्लसच्या टीमने त्यांना नवीन फोन पाठवणार असल्याचे म्हटले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ngP4Qa