मुंबई- '' मालिकेतील विलास पाटीलची भूमिका साकारणारे अभिनेते यांना मालिकेतून रातोरात बाहेर काढलं गेलं. किरण यांच्या दाव्यानुसार, त्यांनी वादग्रस्त पोस्ट आणि राजकीय भूमिका घेतल्या म्हणून त्यांना मालिकेतून काढलं गेलं. तर मालिकेच्या निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, मालिकेतील महिला सहकलाकारांसोबत ते गैरवर्तवणुक करायचे आणि अपशब्द वापरायचे, यासाठी किरण यांना पूर्वसूचना देण्यात आली होती. पण तरीही त्यांच्यात बदल झाला नाही, म्हणून त्यांनी हे पाऊल उचललं. या सगळ्या गोंधळात कोण खरं कोण कोट हे अद्याप कळलं नाही. परंतु आत मालिकेत विलास पाटील यांची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 'मुलगी झाली हो' मालिकेत अभिनेता आनंद अलकुंटे विलास पाटीलची भूमिका साकारणार आहे. याबद्दल प्रोडक्शन हाऊसकडून कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही. आनंद याआधी 'रुद्रम' मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसला होता. याशिवाय त्याने 'बंदिशाळा', 'जोगवा' सारख्या सिनेमांत महत्वाची भूमिका साकारली आहे. तसंच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातदेखील काम केलं आहे. परंतु आता हे 'मुलगी झली हो' मालिकेत विलास पाटीलच्या भूमिकेला न्याय देऊ शकतील का, तसंच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी होतील का, हे तर येणारा काळच ठरवेल. दरम्यान किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मालिकेचं एक नवीन पोस्टर समोर आलं ज्यात किरण माने यांना वगळण्यात आले होते. किरण यांनी साकारलेल्या विलास पाटीलच्या भूमिकेसाठी त्यांचं नेहमीच कौतुक होत असे. तसेच त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढून टाकल्याने मालिकेचे चाहते प्रचंड नाराज आहेत. सोशल मीडियावर #istandwithkiranmane असा हॅश-टॅग ट्रेण्ड झाला होता.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nA838b