नवी दिल्ली: स्मार्टवॉच आणि इयरबड्सची सीरिज लाँच केल्यानंतर ने भारतात आपला नवीन गेमिंग लाँच केले आहे. गेमिंग नेकबँड हा इंस्टंट चार्ज टेक्नोलॉजी, अल्ट्रा-लो लेटेंसी सारख्या फीचर्ससह येतो. कंपनीने काही दिवसांपूर्वीच नॉइज कॅलिबर, नॉइज इवॉल्व २ स्मार्टवॉचसह अनेक प्रोडक्ट्स लाँच केले आहेत. नवीन नेकबँडच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: नवीन लाँचबाबत माहिती देताना कंपनीचे सह-संस्थापक, अमित खत्री म्हणाले की, गेमिंग इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. शानदार अनुभव देणाऱ्या स्मार्ट गॅजेट्सची मागणी वाढली असल्याचे आम्हाला आढळले. आपल्या दमदार फीचर्स, लुक्स आणि डिझाइनमुळे नॉइज कॉम्बॅट गेमर्सला नक्कीच आवडेल. Noise Combat ची किंमत Noise Combat ला भारतात १,७९९ रुपयात लाँच केले आहे. नेकबँडला केवळ थंडर ब्लॅक रंगात खरेदी करू शकता. यात कंट्रोलर आणि इयरबड्सवर बॅकलिट नॉइट्स आहे, जे याला एक आकर्षक लूक देतात. तुम्ही जर एक गेमर असल्यास तुम्हाला नेकबँड नक्कीच आवडेल. Noise Combat चे स्पेसिफिकेशन नॉइज कॉम्बॅट एक गेमिंग नेकबँड असून, जो डेडिकेटेड गेमिंग मोडसह येतो. हा गेमर्सला ४५ मिलीसेकंदापर्यंत अल्ट्रा-लो लेटेंसी प्रदान करतो. नेकबँडचा वापर गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे आणि हँड्स-फ्री कॉलिंगसाठी करू शकता. मात्र, कंपनीने गेमिंगवर विशेष लक्ष दिले आहे. नेकबँड इमर्सिव्ह आणि ओम्नी-डायरेक्शनल साउंड क्वालिटी प्रदान करतो. Noise Combat एक ड्यूल-माइक सिस्टमसह Environmental Voice Cancellation फीचरसोबत येतो. यात क्रिस्टल क्लिअर साउंड आणि कॉल क्वालिटीसाठी १० एमएम ड्रायव्हर्स दिले आहेत. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यावर २५ तास याचा वापर करू शकता. इयरबड्समध्ये इंस्टाचार्ज टेक्नोलॉजी दिली असून, याद्वारे ८ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ८ तासांचा प्लेटाइम मिळतो. नेकबँड टाइप-सी चार्जिंग केबलसह येतो. यात कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ ५.० दिले आहे. तसेच, पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपीएक्स ५ रेटिंग मिळाले आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fCAoXq