चेन्नई: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून खूप मोठी बातमी येऊन थडकली आहे. दक्षिणेचा सुपरस्टार आणि त्याची पत्नी व सुपरस्टार रजनीकांतची मुलगी या दाम्पत्याने चाहत्यांना अचानक मोठा धक्का दिला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांनी काडीमोड घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे तब्बल १८ वर्षांच्या दोघांच्या संसाराला ब्रेक लागला आहे. ( ) वाचा: धनुष आणि ऐश्वर्या वेगळे झाले असून दोघांनीही याबाबत सोमवारी रात्री उशिरा ट्वीट केले आहे. 'अठरा वर्षे आम्ही सोबत राहिलो. मित्र, जोडीदार, पालक, एकमेकांचे शुभचिंतक बनत एकमेकाला समजून घेत, एकत्रपणे आम्ही हा प्रवास केला. आता आम्ही ज्या टप्प्यावर आलो आहोत तिथून आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या असतील. ऐश्वर्या आणि मी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांपासून वेगळं होऊन स्वत:ला वेळ द्यावा आणि स्वत:ला धुंडाळावे असा मनोनिग्रह आम्ही केला आहे. आमच्या या निर्णयाचा आपण सन्मान कराल आणि या स्थितीतून पुढे जाण्यासाठी आवश्यक प्रायव्हसी आपण आम्हाला द्याल अशी आशा आहे', अशा भावना धनुषने पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत. ऐश्वर्यानेही अशाच प्रकारची पोस्ट ट्वीटरवर शेअर केली आहे. या बातमीने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत मोठा धमाका झाला आहे. वाचा: दरम्यान, यांची दुसरी मुलगी सौंदर्या हिचाही घटस्फोट झालेला आहे. सौंदर्याचा पती अश्विन बिझनेसमन होता. २०१७ मध्ये दोघे वेगळे झाले. त्यानंतर आता ऐश्वर्यानेही १८ वर्षांच्या संसारानंतर धनुषसोबत काडीमोड घेतला आहे. चाहत्यांना दुसरा मोठा धक्का आणि नागा चैतन्य यांचा घटस्फोटाच्या बातमीने आधीच दाक्षिणात्य सिनेसृष्टीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असताना त्यातून सावरण्याआधीच धनुष आणि ऐश्वर्याचा काडीमोड हा दुसरा धक्का ठरला आहे. धनुष आणि ऐश्वर्या २००४ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. या दाम्पत्याला यात्रा आणि लिंगा अशी दोन मुले आहेत. मधल्या काळात या दोघांच्या काडीमोडाच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र दोघांनी नेहमीच त्याबाबत कधी जाहीर वाच्यता केली नाही. धनुष हा प्रसिद्ध निर्माते कस्तुरी राज यांचा मुलगा असून अभिनयासोबतच निर्मिती, कोरिओग्राफी, पार्श्वगायन, गीतकार, कथालेखक अशी अष्टपैलू कामगिरी त्याने सिनेसृष्टीच्या पिचवर केली आहे. आतापर्यंत ४६ चित्रपटांत त्याने भूमिका साकारल्या असून एक फिल्म फेयर अवॉर्ड, ४ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यासह एकूण १३ पुरस्कार त्याने पटकावले आहेत. वाचा:
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3roKXmh