Full Width(True/False)

कोयनाचा बॉयफ्रेंड तिला बाथरूममध्ये बंद करून ठेवायचा

बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा (Koena Mitra) तिचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी करू शकली नाही तरी आज अनेकांना तिचं नाव माहीत आहे. याचं मुक्य कारण म्हणजे 'मुसाफिर' सिनेमातील 'साकी साकी' या गाण्याने तिला मिळवून दिलेली प्रसिद्धी. रातोरात स्टार झालेल्या कोयनाच्या करिअरमध्ये जेवढे चढ- उतार होते त्याहून जास्त कठीण तिचं वैयक्तिक आयुष्य गेलं आहे. कोयनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. शाळेत असताना तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आणि अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याच्या स्वप्नाने ती पुढे जात राहिली. पण फार कमी लोकांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहीत आहे. स्वतः कोयनाने बिग बॉसच्या घरात असताना अनेक धक्कादायक खुलासे केले होते. याबद्दल इथे वाचू.

बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा हे नाव आज कोणी विसरलं नसलं तरी हे नाव कोणाच्या फारसं लक्षातही नाही. साकी साकी गाण्यामुळे घराघरात पोहोचलेली कोयना एका चुकीमुळे सर्वांपासून कायमची दूर गेली.

बॉयफ्रेंडने कोयना मित्राचं जगणं केलेलं मुश्किल, बाथरूममध्ये बंद करून ठेवायचा आणि..

बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा (Koena Mitra) तिचं फिल्मी करिअर फारसं यशस्वी करू शकली नाही तरी आज अनेकांना तिचं नाव माहीत आहे. याचं मुक्य कारण म्हणजे 'मुसाफिर' सिनेमातील 'साकी साकी' या गाण्याने तिला मिळवून दिलेली प्रसिद्धी. रातोरात स्टार झालेल्या कोयनाच्या करिअरमध्ये जेवढे चढ- उतार होते त्याहून जास्त कठीण तिचं वैयक्तिक आयुष्य गेलं आहे. कोयनाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. शाळेत असताना तिने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आणि अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याच्या स्वप्नाने ती पुढे जात राहिली. पण फार कमी लोकांना तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहीत आहे. स्वतः कोयनाने बिग बॉसच्या घरात असताना अनेक धक्कादायक खुलासे केले होते. याबद्दल इथे वाचू.

करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा तोल सांभाळता आला नाही
करिअर आणि वैयक्तिक आयुष्याचा तोल सांभाळता आला नाही

कोयनाने मॉडेलिंगमध्ये खूप नाव कमावलं आणि त्यानंतर ती अनेक जाहिरातींमध्येही दिसली. तिचा प्रवास म्युझिक अल्बम आणि आयटम साँगपर्यंत पोहोचला. स्वतः कोयना म्हणाली होती की, मॉडेलिंगच्या जगात नाव कमावल्यानंतर तिचा बॉलिवूडचा मार्ग सुकर झाला होता. तिला काम मागण्यासाठी बटकावं लागलं नव्हतं. पण एक वेळ अशी येईल की ती विस्मृतीत जाईल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

कोयना मित्राचं मॉडेलिंग क्षेत्रात नाव होतं
कोयना मित्राचं मॉडेलिंग क्षेत्रात नाव होतं

राम गोपाल वर्मा यांचा २००२ मध्ये 'रोड' हा सिनेमा केला होता. या सिनेमासाठी त्यांची एक रणनीती होती, ती म्हणजे सिनेमात आयटम नंबर ठेवायचं. आयटम नंबरमुळे प्रेक्षकांची सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढेल असं त्यांना वाटत होतं. ते ही ऑफर घेऊन तत्कालीन प्रसिद्ध मॉडेल कोएनाकडे गेले. दोघांमध्ये करार झाला. 'रोड' मध्ये स्पेशल अपिअरन्समध्ये कोयनाने 'खुल्लम खुल्ला' आयटम साँगवर डान्स केला.

राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमातून केली बॉलिवूडमध्ये एण्ट्री
राम गोपाल वर्मा यांच्या सिनेमातून केली बॉलिवूडमध्ये एण्ट्री

२००२ मध्ये 'खुल्लम खुल्ला' या गाण्याने कोयनाची बॉलिवूडमध्ये एण्ट्री झाली. पुढच्या वर्षी ती 'धूल' या तमिळ सिनेमात स्पेशल अपिअरन्समध्ये दिसली. पण आतापर्यंत कोयनाला मुख्य भूमिका मिळाली नव्हती आणि ती इंडस्ट्रीत आपलं नाव चमकवण्याचा प्रयत्न करत होती. दरम्यान, एक दिवस कोएना दिग्दर्शक संजय गुप्ता यांना भेटली. संजय २००४ मध्ये अनिल कपूर, आदित्य पांचोली, समीरा रेड्डी आणि संजय दत्त यांना घेऊन 'मुसाफिर' सिनेमा बनवत होते.

संजय गुप्ता यांनी कोयनाला दिला 'मुसाफिर' सिनेमा
संजय गुप्ता यांनी कोयनाला दिला 'मुसाफिर' सिनेमा

कोयनासोबत संजय गुप्ताची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. दुसऱ्या दिवशी त्यांनी कोयनाला फोन केला आणि तिला 'मुसाफिर' सिनेमासाठी संपर्क केला. ही ऑफर ऐकून कोयनाही खूश झाली कारण तिला सिनेमात भूमिका मिळण्याची ही पहिलीच वेळ होती. ती संजय दत्त आणि अनिल कपूरसारख्या दमदार अभिनेत्यांसोबत काम करणार होती. कोयनाने 'मुसाफिर' मध्ये 'लारा'ची भूमिका साकारली होती आणि 'साकी साकी' हे आयटम साँगही केले होते.

साकी साकी गाण्याने दिली ओळख
साकी साकी गाण्याने दिली ओळख

कोयनाचा परफॉर्मन्स भारी होता आणि तिच्या अभिनयापेक्षा 'साकी साकी' हे गाणं जास्त गाजलं होतं. २००४ नंतर कोयना मित्रा 'साकी साकी' गर्ल झाली होती. त्याच वर्षी तिचा 'एक खिलाडी एक हसीना' आणि 'इंसान' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले होते. असं म्हटलं जातं की कोयनाने तिच्या करिअरमध्ये मोठी चूक केली आणि त्यामुळे तिच्या करिअरला चांगलाच फटका बसला. ही चूक होती प्लॅस्टिक सर्जरी करण्याची. याच कारणामुळे कोयनाला अनेक वर्ष विस्मृतीचं जीवन जगावं लागलं.

एक चुकीचा निर्णय आणि आयुष्य बदललं
एक चुकीचा निर्णय आणि आयुष्य बदललं

एका मुलाखतीत कोयनाने स्वत: सांगितलं होतं की, शस्त्रक्रियेमुळे तिचा चेहरा पुरता बिघडला होता. कोएनावर 'राइनोप्लास्टी' नावाची सुधारक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. याचे काही दुष्परिणाम झाले. चेहऱ्यावरची सूज एवढी वाढली होती की ही प्लॅस्टिक सर्जरी ठीक करण्यासाठी तिला अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या चुकीमुळे कोयनाचं करिअर बुडालं. बऱ्याच वर्षांनंतर कोयनाने पुन्हा करिअरला उजाळा देण्याचा प्रयत्न केला. शोमध्ये कोयनाने वैयक्तिक आयुष्यातील अनेक वेदनादायक पैलूही शेअर केले.

वैयक्तिक आयुष्यातही सहन करावा लागला त्रास
वैयक्तिक आयुष्यातही सहन करावा लागला त्रास

जोडीदाराच्या बाबतीतही कोयनाचं नशीब चांगलं नव्हतं. कोएना एका तुर्की माणसासोबत रिलेशनशिपमध्ये होती पण या नात्यात तिला फक्त वेदना आणि छळ मिळाला. कोयनाने सांगितलं होतं की, तिचा प्रियकर सुरुवातीला तिच्यासोबत चांगला वागत होता आणि आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं, पण हळूहळू तो फार पझेसिव्ह होऊ लागला आणि अभिनेत्रीसोबत गैरवर्तन करू लागला.

नात्याने दिल्या अनेक वेदना
नात्याने दिल्या अनेक वेदना

कोयनाने सांगितलं की, एकदा तिला तिच्या जोडीदाराने बाथरूममध्ये बंद केलं होतं, जेणेकरून ती कामावर जाऊ नये. त्याचवेळी, एकदा प्रियकराने कोयनाला धमकी दिली की ती कधीही तुर्कीमध्ये गेली तर तो कोएनाचा पासपोर्ट जाळून टाकेल जेणेकरून ती भारतात परत जाऊ शकणार नाही. कोयनाने सांगितले की, या कटु नात्यातून बाहेर पडल्यानंतर तिची प्रकृती बिघडली होती. ती तणावाखाली राहू लागली आणि अनेक वर्षे ती कोणालाही डेट करण्याचा विचारही करू शकत नव्हती.

from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HJT6Iq