Full Width(True/False)

Drone Service: भारीच !आता ड्रोन पोहोचवणार तुमच्या घरापर्यंत सामान, मुंबई, पुण्यासह या शहरांमध्ये लवकरच सेवा सुरू, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ड्रोनचा वापर देखील विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात आहे. ड्रोन लॉजिस्टिक डिलिव्हरीसाठी परदेशात काम करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत आणि भारतातील काही कंपन्या याचा विचार करत असून यापैकी एक, इलेक्ट्रिक तर्फे अलीकडेच सांगण्यात आले आहे की, कंपनी ड्रोन लॉजिस्टिक विभागात प्रवेश करणार आहे. यासाठी कंपनीने TSAW ड्रोनशी भागीदारी देखील केली आहे. वाचा: कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यात देशातील चार शहरांमध्ये २०० ड्रोन तैनात करण्याची कंपनीची योजना आहे. या सेवा दिल्ली-एनसीआर, बेंगळुरू, हैदराबाद, मुंबई आणि पुणे अशा सर्व शहरांमध्ये सुरू करण्याची योजना आहे. जिथे Zypp इलेक्ट्रिक कार्यरत आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, तैनात केलेले सर्व ड्रोन स्मार्ट लॉकर्ससह सुसज्ज असतील जे केवळ ग्राहकांना प्रदान केलेल्या ओटीपीद्वारे उघडले जाऊ शकतील. जे, वितरणाच्या वेळी वस्तूंची सुरक्षा सुनिश्चित करतील. कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ताफ्याच्या विस्ताराचा भाग म्हणून हे ड्रोन जोडले जातील. यामुळे वैद्यकीय, अन्नधान्य, किराणा सामानाची डिलिव्हरी लांब पल्ल्यापर्यंत आणि डोंगराळ भागातील रस्त्यांद्वारे करणे अवघड होते, जे सोपे केले जाईल. ड्रोनच्या वापरामुळे वाहतूक कोंडी आणि मानवी चालकांवर जास्त अवलंबून राहणे यामुळे प्रगतीचा वेग वाढू शकतो, असा विश्वासही कंपनीने व्यक्त केला आहे. ऑटोमॅटिक डिलिव्हरीसाठी या ड्रोनची ओळख करून दिल्याने लास्ट-माईल डिलिव्हरीचा वेळ आणि खर्च देखील कमी होऊ शकतो. TSAW Drones हे एक स्टार्ट-अप आहे जे लॉजिस्टिकमध्ये ड्रोन सादर करण्यावर काम करते. त्यांनी एंड-टू-एंड इंटेलिजेंट टेक्नॉलॉजी स्टॅक देखील तयार केला आहे. ज्यामध्ये ड्रोनसाठी स्मार्ट ग्राउंड कंट्रोल स्टेशन (GCS), मानवरहित हवाई वाहतूक व्यवस्थापन (UTM) आणि AI- समाविष्ट आहे. ड्रोन तुमच्या घरापर्यंत सामान पोहोचवणार Zypp इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक आणि सीईओ आकाश गुप्ता यांनी या योजनेबद्दल माहिती देतांना सांगितले की, "ते विविध ठिकाणी डिलिव्हरी सुलभ आणि स्मार्ट बनविण्यास उत्सुक आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ड्रोन ही ईव्ही वाहने उडवत आहेत." आकाश गुप्ता पुढे म्हणाले की "ड्रोन्स वैद्यकीय, खाद्यपदार्थ, किराणा मालाचे पार्सल १/१० वेळात लांब पल्ल्यापर्यंत पोहोचवतील. कंपनीने असेही नमूद केले आहे की, त्यांनी सुरुवातीच्या टप्प्यातील इनक्यूबेटर, व्हेंचर कॅटॅलिस्टसह त्याच्या इव्हॉल्व्ह इनोव्हेशन प्रोग्रामचा भाग म्हणून TSAW ड्रोनची निवड केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट EV स्टार्ट-अप्सना समर्थन देणे हे आहे. ज्यांचे उद्दिष्ट लास्ट माईल लॉजिस्टिक आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) क्षेत्रामध्ये सुधारणा करणे आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qcuHpe