Full Width(True/False)

हातात भगवतगीता आणि टीशर्टवर लिहिलं जावेद अख्तरांचं नाव

मुंबईः आणि सोशल मीडियावरचा ट्रेंड हे गेल्या काही दिवसांपासून नवीन समीकरण रुढ झाले आहे. उर्फी रोज नवनवीन काही गोष्टी करते आणि त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये येते. अनेकदा तिच्या हटके, बोल्ड अशा ड्रेसिंग सेन्समुळे ती चर्चेत असते. आता देखील उर्फी तिच्या कपड्यांवर लिहिलेल्या अनोख्या मेसेजमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस ओटीटीमुळे उर्फी जावेद चर्चेत आली. अर्थात या कार्यक्रमात ती फारशी चमकली नाही. उलट कार्यक्रमातून बाहेर पडल्यावरच ती जास्त चर्चेत आली. बोल्ड, अतरंगी फॅशनचे कपडे घालून फोटो सेशन करणं, सार्वजनिक ठिकाणी फिरणं यामुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. अर्थात बोल्ड कपड्यांमुळे तिला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं आहे. पण याची फिकीर उर्फीने कधी केली नाही. याउलट उर्फीने आता जो टी-शर्ट घातला, त्यामुळे तिने सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या टी-शर्टवर चक्क जावेद अख्तर यांचं नाव लिहिलं आहे. 'जावेद अख्तर यांची मी नात नाही.' असा मेसेज यावर लिहिलेला आहे. अर्थात हे लिहिण्यामागे देखील कारण आहे. अनेकदा उर्फीला तू जावेद अख्तर यांची नात आहेस का, असा प्रश्न सातत्यानं सोशल मीडियावरून विचारला जातो. त्याला उत्तर देऊन वैतागलेल्या उर्फीने सर्वांना हे कळावं, यासाठी हा मेसेज देणारा टी- शर्ट घालूनच लोकांसमोर जाण्याची युक्ती तिने वापरली. टी-शर्टसोबतच उर्फीच्या हातामध्ये असलेल्या आणखी एका गोष्टीमुळे सर्वांचं लक्ष वेधलं. कारण उर्फीच्या हातामध्ये भगवतगीता दिसत आहे. उर्फीचा एकूणच मस्तमौला अंदाज पाहून ती धार्मिक पुस्तक वाचत असावी, असे वाटत नाही. परंतु तिच्या हातात धार्मिक ग्रंथ दिसल्यामुळे ती खरोखरच कमाल असल्याचे कळते. गेल्या काही दिवसांपासून उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता उर्फीने विमानतळावर जाताना घातलेल्या टी-शर्टने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ‘मी जावेद अख्तर यांची नात नाही’ असे लिहिलेला टीशर्ट उर्फीने घातला आहे. तिच्या या टी-शर्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दरम्यान उर्फीने हातात भगवद् गीता घेतल्याचं दिसत आहे. उर्फीला तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. तिचे कपडे कधी एवढे विचित्र असतात की तिचा ड्रेस डिझायनर कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो. उर्फी कधीही ट्रोलिंगकडे लक्ष देत नाही. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qefbJd