मुंबई- प्रत्येक मालिका टीआरपीच्या यादीत पहिलं स्थान पटकावण्यासाठी झटत असते. वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना घेऊन मालिका प्रेक्षकांच मन जिंकण्याचा प्रयत्न करत असते. आता या संकल्पना आणि ट्विस्ट प्रेक्षकांना भावले आहेत का नाही हे आठवड्याच्या शेवटी कळत, जेव्हा टीआरपी रेटिंग समोर येतात. या आठवड्याचे टीआरपी रेटिंग आले आहेत ज्यात अनेक बदल झालेले दिसत आहेत. सर्वात चर्चेत असलेली मालिका '' मागच्या दोन आठवड्यांप्रमाणे याही आठवड्यात पाचव्या स्थानवर आहे. तसंच मागच्या आठवड्याप्रमाणे यावेळेसही पहिल्या क्रमांकावर स्टार प्रवाहवरली 'रंग माझा वेगळा' ही मालिका आहे. मालिकेत लग्नाचा ट्रॅक सुरू असूनही '' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर घसरली आहे. तर दुसरं स्थान 'धुमधडाका २०२२' ने पटकावल आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आहे. या आठवड्यात सहाव्या स्थानावर आहे 'फुलाला सुगंध मातीचा ' मालिका तर सातव्या स्थानावर झी मराठी ची ' माझी तुझी रेशीमगाठ' आणि आठव्या स्थानावर आहे स्टार प्रवाह वरील मालिका ' ठिपक्यांची रांगोळी ' झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'येऊ कशी तशी मी नांदायला' ही नवव्या स्थानावरून दहाव्या स्थानावर आली आहे. तर तिची जागा 'स्वाभिमान:शोधअस्तित्वाचा' या मालिकेने घतली आली आहे. 'सहकुटुंब सहपरिवार' आणि 'देवमाणूस' या वेळीस टॉप १० मालिकांच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33EVu4m