मुंबई: सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून काढण्यात आलं. या घटनेचे पडसाद आता सोशल मीडिया, मनोरंजन क्षेत्रासह राजकीय पटलावरही उमटू लागले आहेत. याविषयी कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणाला आता वेगळं वळण येण्याची चिन्हं आहेत. या प्रकरणी आता वाहिनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. किरण माने यांना सोशल मीडियावरील राजकीय पोस्टमुळं नव्हे तर त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं आहे. या प्रकरणाबद्दल स्टार प्रवाह वाहिनीकडून अधिकृत पत्रक जाहीर करण्यात आलं आहे. 'मुलगी झाली हो' मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारणारे अभिनेते किरण माने यांनी लावलेले आरोप हे बिनबुडाचे आणि काल्पनिक आहे. हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे. निर्मिती संस्थेने माने यांना मालिकेतून काढण्याचा निर्णय घेतला. मालिकेतील अनेक सहकलाकारांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळंच हा निर्मण घेण्यात आलाय. सह-कलाकारांसह, विशेषतः, शोच्या महिला अभिनेत्रीशी केलेल्या गैरवर्तनामुळं हा निर्णय घेतल्याचं प्रोडक्शन हाऊसनं म्हटलं आहे. इतकंच नाही तर इतर काही कर्मचाऱ्यांनी देखील त्यांच्या विरोधातत आक्षेपार्ह वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. अनेकदा समज देऊनही त्यांनी त्याच्या वागणुकीत बदल केला नाही त्यामुळं त्यांना मालिकेतून काढलं गेलं. या निर्णयाचे आम्ही समर्थन करतो', असंही वाहिनीनं म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3GOjQYt