Full Width(True/False)

Budget Smartwatches: ५०० रुपयांपेक्षाही कमीमध्ये खरेदी करा या स्टायलिश स्मार्टवॉचेस, बजेट गिफ्टसाठी बेस्ट पर्याय, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: जर तुम्ही बऱ्याच काळापासून स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु जास्त किंमतीमुळे ते करू शकत नसाल, तर आता काळजीचे कारण नाही. सध्या बाजारात अनेक उत्तम पर्याय उपलब्ध आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या आवडीची स्मार्टवॉच निवडू शकता. फ्लिपकार्टवर सर्वात कमी किंमतीत स्मार्टवॉच ऑफर करण्यात येत आहे. ही किंमत इतकी कमी आहे की तुम्ही ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही स्मार्टवॉचेस घेऊन आलो आहोत ज्या तुमच्या बजेटमध्ये फिट होतील. वाचा: IMMUTABLE 70 _NEW 2021 SMARTWATCH : या स्मार्टवॉचची किंमत ४९६ रुपये आहे. त्याची मूळ किंमत ९९९ रुपये आहे आणि त्यावर पूर्ण ५० टक्के सूट देण्यात येत आहे, त्यानंतर ते निम्म्याहून कमी किमतीत खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच विकत घेतल्यास यामध्ये कॉलिंग फंक्शन, टच स्क्रीन आणि फिटनेस आणि आऊटडोअर यांसारख्या उत्तम सुविधा देण्यात आल्या आहेत. हे स्मार्ट घड्याळ ७ दिवसांच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह येते आणि तुम्हाला ते आवडत नसल्यास तुम्ही ते १ आठवड्याच्या आत परत करू शकता. fitness watch : या स्मार्टवॉचवर पूर्ण ५० टक्के सूट देखील दिली जात आहे. त्यानंतर ग्राहक ते ४९५ मध्ये खरेदी करू शकतात. हे स्मार्टवॉच ७ दिवसांच्या रिप्लेसमेंट पॉलिसीसह तसेच कॉलिंग फंक्शनसह टच स्क्रीन आणि फिटनेस आणि आउटडोर यासारख्या वैशिष्ट्यांसह देखील येते. या स्मार्ट घड्याळात Moving distance , Finf your phone, स्लीप मॉनिटरिंग, फोन रिमाइंडर, रक्तदाब, हृदय गती यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FuA0oe