Full Width(True/False)

'हिंदी उच्चारातून मराठी काढण्यासाठी उर्दूच्या जवळ गेले'

मुंबई- भारताच्या दिग्गज गायिका यांना नुकतेच करोना संसर्ग आणि न्यूमोनियामुळे मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून लता दीदींना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. यांना सध्या इन्वेसिव वेंटिलेटर सपॉर्टची गरज नसून त्यांना ब्रीच कँडीच्या डी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉ प्रतीत समधानी त्यांच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या व्हायरल होत आहे. यात त्यांनी गायन, शिस्त आणि मेहनतीवर भाष्य केलं आहे. 'माझ्या गायनात नैसर्गिक प्रतिभेचा वाटा ७५ टक्के आहे. उरलेला भाग मेहनतीचा आहे, त्यात रियाज करणं, खाण्या-पिण्याची काळजी घेणं या सगळ्या गोष्टी येतात. पण मी जेवणाचे नियम फारसे पाळत नाही. लोक म्हणायचे की मिरच्या खाल्ल्याने घसा खवखवतो, मी खूप खाते, लोणची खाते, दही खाते, मी कोणत्याही गोष्टीपासून स्वतःला रोखत नाही. बाबा म्हणायचे की कोणतीही गोष्ट करण्यापासून स्वतःला कधी रोखू नये. माणसाने गात रहाणं महत्त्वाचं आहे. घसा गाता राहिला पाहिजे जे दररोजच्या रियाजाने शक्य आहे. मी आयुष्यभर हेच केलं. शिस्तीचं स्वतःचं असं एक महत्त्व आहे. मी संयमांपासून दूर राहिले, पण नेहमी शिस्त पाळली. स्वतः ला कोणतीही गोष्ट खाण्या- पिण्यापासून रोखण्यासाठी मी शिस्तीचं पालन केलं. शिस्त हा देखील कठोर परिश्रमाचा एक भाग आहे, जो यशासाठी खूप महत्वाचा आहे. जबाबदाऱ्याही मेहनतीला एक प्रकारे धक्का मारण्याचं काम करतं. माझे वडील नसताना मी पौगंडावस्थेत होती. घर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर होती, कारण मी सगळ्यात मोठी होती. काम मिळत राहण्यासाठी माझं हिंदी चांगलं असणं गरजेचं होतं. आम्ही मराठी आहोत. जेव्हा मराठी लोक हिंदी बोलतात तेव्हा त्यांच्या उच्चारातही मराठीचं प्रतिबिंब दिसते. माझ्या हिंदी उच्चारातून मराठी काढण्यासाठी मला उर्दूच्या जवळ जावं लागलं. उर्दू आणि हिंदी शिकण्यासाठी खूप मेहनत घेतली. यात मला पाकिस्तानचे मास्टर गुलाम हैदर यांनी मदत केली, त्यांच्यामुळेच मी पार्श्वगायक बनू शकले. लोक म्हणाले होते की माझा आवाज पातळ आहे, मला चित्रपटात काम मिळू शकत नाही. पण गुलाम यांनी ठाम राहून मला संधी दिली. गाण्यात श्वास खूप महत्त्वाचा आहे, विशेषत: जेव्हा तुम्ही माइकवर गाणे गात असाल. आमच्या काळात श्वासाचा आवाज चांगला मानला जात नव्हता. अनिल विश्वासजी यांनी मला श्वासावर नियंत्रण ठेवायला शिकवले. ही गोष्ट १९४७ ची आहे. मी त्यांच्यासाठी गात होते. त्यांनी मला शिकवले की कोणत्या ओळीनंतर कधी श्वास घ्यायचा. श्वास केव्हा घेतला जातो ते कळू नये, याची शिकवण त्यांनी दिली. मेहनत सतत करावी लागते. काम सुरू करण्यापूर्वी आणि काम मिळाल्यानंतरही. काम मिळवण्यासाठी आधी मेहनत आणि नंतर ते काम टिकवून ठेवण्यासाठीही तेवढीच मेहनत लागते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zUC8EE