Full Width(True/False)

Gmail: तुमचे जीमेल अकाउंट तर हॅक झाले नाही ना? ‘या’ सोप्या स्टेप्सच्या माध्यमातून करा चेक

नवी दिल्ली: आपण अनेक स्मार्टफोन, लॅपटॉप्सवर अकाउंटने लॉग इन करत असतो. अशा स्थितीमध्ये जीमेल अउंट हॅक होण्याची शक्यता असते. हॅकर्स तुमचे हॅक करून तुमचा महत्त्वाचे डेटा चोरी करू शकतात. त्यामुळे अशा स्थितीत जीमेल अकाउंट सुरक्षित असणे गरजेचे आहे. तुम्ही सहज सोप्या स्टेप्स फॉलो करून तुमचे जीमेल अकाउंट हॅक झाले आहे की नाही, हे तपासू शकता. तसेच, अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी काही टिप्स देखील वापरू शकता. वाचा: या स्टेप्स फॉलो करून चेक करा तुमचे अकाउंट हॅक तर झाले नाही?
  • सर्वात प्रथम क्रोम ब्राउजरवर सॉफ्टवेअर डाउनलोड करा. इंस्टॉल केल्यानंतर क्रोम एक्सटेंशन लॉग इन क्रेडेंशियल चेक करेल.
  • तुमचा यूजरनेम आणि पासवर्ड गुगलच्या डेटा बेसमध्ये उपलब्ध असल्यास ४ कोटींपैकी एका पासवर्डशी मॅच करेल. पासवर्ड लीक झाला असल्यास सॉफ्टवेअर अलर्ट करेल.
  • त्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल, ज्यात संबंधित वेबसाइटच्या पासवर्ड चेकअपची माहिती द्यायची आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही ब्राउजरवर सेव्ह कोणत्याही पासवर्डला तपासू शकता. येथे तुम्हाला डेटा लीकची माहिती मिळेल.
अकाउंट हँक झाल्यास तुम्हाला काही स्टेप फॉलो कराव्या लागतील. सर्वात प्रथम तुमच्या अकाउंटचा पासवर्ड बदला. केवळ जीमेलच नाही तर इतर महत्त्वाचे पासवर्ड देखील बदलावेत. Gmail अकाउंटला असे करा रिकव्हर
  • सर्वात प्रथम अकाउंटच्या रिकव्हरी पेजवर जा.
  • आता पासवर्ड लक्षात नसल्यास वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या.
  • आता रिकव्हरी ईमेल अथवा फोन नंबरचा वापर करा.
  • त्यानंतर तुम्हाला एक रिकव्हरी कोड येईल.
  • याशिवाय तुम्ही सिक्योरिटीसंबंधित प्रश्नाचे उत्तर देखील देऊ शकता.
  • तुम्हाला ईमेल अथवा मोबाइल नंबरवर रिकव्हरी कोड आल्यानंतर तो जीमेलमध्ये इंटर करा व त्यानंतर गुगल पासवर्ड बदलण्यास सांगेल.
  • पासवर्ड बदलल्यानंतर साइन इन करा. त्यानंतर जीमेल तुम्हाला सिक्योरिटी चेक करायला सांगेल. सिक्योरिटी चेक करा व त्यानंतर सिक्योरिटी इन्फॉर्मेशन बदला.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fOqB0g