नवी दिल्ली: अनेकांकडे जुने मोबाईल फोन आणि टॅबलेट असतात. काहींना तर नव-नवीन आणि लेटेस्ट स्मार्टफोन खरेदी करायची हौस देखील असते. परंतु, याच स्मार्टफोन्समध्ये सोन्यासारखा मौल्यवान धातू आहे हे फार कमी लोकांना माहित असते. उदाहरणार्थ ४१ मोबाईल फोन्समधून १ ग्रॅम सोने मिळविता येते. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये थोड्या प्रमाणात शुद्ध सोने असते. जाणून घ्या याविषयी सविस्तर. वाचा: स्मार्टफोनमध्ये असतात ६० वेग-वेगळ्या प्रकारचे घटक : स्मार्टफोनमध्ये ६० वेग-वेगळ्या प्रकारचे घटक असतात. ज्यात , केवळ सोनेच नाही तर तांबे आणि चांदीचा देखील समावेश असतो. हे तिन्ही धातू विजेचे चांगले वाहक आहेत. सहसा सर्किटमध्ये सोन्याचा पातळ थर असतो. ज्यामुळे ते खराब होत नाही आणि टिकाऊ कनेक्शन सुनिश्चित करते. स्मार्टफोनमध्ये सोन्याचे प्रमाण खूपच कमी असते. हे सोने स्मार्टफोनच्या सर्किटमध्ये वापरले जाते. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या जुन्या स्मार्टफोनमधून तुम्ही सोने काढू शकता, तर तसे अजिबात नाही. कारण, ते काढण्याची प्रक्रिया खूपच कठीणआहे आणि ती फक्त व्यावसायिकच करू शकतात. कमी प्रमाणामुळे तुम्हाला एक ते दोन ग्रॅम सोने मिळविण्यासाठी अनेक स्मार्टफोन्सची गरज भासेल. त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधून सोने काढता येईल असा विचार जर तुम्ही करत असाल तर ते शक्य नाही. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे स्मार्टफोनमधून सोने काढण्यासाठी विशेष रसायनांचा वापर केला जातो आणि या प्रक्रियेलाही बराच वेळ लागतो. अनेक टप्पे पार केल्यानंतर स्मार्टफोनमधून सोने बाहेर येते. ही प्रक्रिया खूप मोठी असते. शिवाय, त्याबद्दल माहिती देखील मिळू शकत नाही. काही व्यावसायिकांनाच याची पूर्ण माहिती असते. जर तुमच्या स्मार्टफोनमधील सोन्याची किंमत काढली तर ती केवळ ५० ते १०० रुपयांच्या दरम्यान असेल. यापेक्षा जास्त किमतीचे सोने कोणत्याही स्मार्टफोनमध्ये वापरले जात नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FLsUeZ