Full Width(True/False)

Ration Card: देशातील कोणत्याही भागात मोफत मिळेल धान्य, घरबसल्या लिंक करा Aadhaar-Ration Card; पाहा प्रोसेस

नवी दिल्ली : जर तुम्ही सरकारद्वारे दिल्या जाणारे मोफत धान्यासाठी पात्र असाल तर त्वरित आणि लिंक करणे गरजेचे आहे. आधार कार्डच्या मदतीने रेशन कार्डधारकांना त्वरित लाभ मिळते. करोनानंतर सरकारने 'वन नेशन वन रेशन कार्ड'ची सुरुवात केली असून, याद्वारे देशातील कोणत्याही भागात धान्य मिळेल. वाचा: या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे रेशन कार्ड-आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. जर तुम्ही अद्याप Aadhaar-Ration Link केले नसल्यास, घरबसल्या ही प्रक्रिया करू शकता. याविषयी सविस्तर जाणून घेऊया. ऑनलाइन असे लिंक करा Aadhaar-Ration कार्ड
  • सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइट uidai.gov.in जा.
  • त्यानंतर 'Start Now' वर क्लिक करा.
  • आता तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता, जिल्हा व राज्याची माहिती द्यायची आहे.
  • यानंतर ' Benefit' पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला आधार कार्ड नंबर, रेशन कार्ड नंबर, ई-मेल एड्रेस आणि मोबाइल नंबर इत्यादी माहिती द्यावी लागेल.
  • माहिती भरल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल.
  • ओटीपी भरल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल.
  • ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे आधार व्हेरिफाय होईल व रेशन कार्डशी लिंक झाले असेल.
मेरा रेशन अ‍ॅपचा होईल उपयोग मेरा रेशन अ‍ॅपच्या मदतीने रेशन कार्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. याशिवाय रेशन कार्ड डाउनलोड देखील करता येईल. तसेच, रेशन-आधार कार्ड लिंक आहे की नाही हे पाहू शकता व लिंक देखील करता येईल. तसेच, तुमच्या रेशन कार्डवर किती धान्य वितरित केले आहे, आजुबाजूच्या रेशन डीलरच्या दुकानांची माहिती मिळेल. तुम्ही रेशन डीलर देखील बदलू शकता. या अ‍ॅपला तुम्ही वेगवेगळ्या १० भाषांमध्ये वापरू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33uwKfC