Full Width(True/False)

Paytm App: सावधान! तुम्ही तर वापरत नाही ‘हे’ बनावट Paytm अ‍ॅप? खावी लागेल जेलची हवा; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. सध्या बाजारात ऑनलाइन पेमेंटसाठी , , सह अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. सुरक्षित पेमेंटसाठी या अ‍ॅप्सचा वापर केला जातो. मात्र, ऑनलाइन फसवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधले जात असून, यामुळे खासकरून दुकानदारांना सुरक्षित राहणे गरजेचे आहे. वाचाः Paytm ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीला एका बनावट Paytm अ‍ॅपची माहिती मिळाली आहे, याद्वारे चुकीचे पेमेंट कन्फर्मेशन पेजवर रिडायरेक्ट केले जाते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ देखील व्हायरल होत असून, यात या बनावट अ‍ॅपबाबत माहिती दिली आहे. या बनावट पेटीएम अ‍ॅप पेमेंट कन्फर्मेशन पेजचा उपयोग दुकानदारांची फसवणूक करण्यासाठी केला जातो. सध्या पेटीएमचे जवळपास २३ मिलियन मर्चेंट आहेत. ग्राहकांनी पेमेंट केल्यावर रक्कम मिळाली की नाही, हे व्हेरिफाय करण्याची पद्धत देखील कंपनीने सांगितली आहे. पेमेंट रिसिप्ट कन्फर्म करण्यासाठी दुकानादार वापरू शकतात या तीन पद्धती
  • SMS नॉटिफिकेशन
  • Paytm फॉर Business App मधील नॉटिफिकेशन
  • पेटीएम साउंड बॉक्स
Paytm Soundbox हे वेगवेगळे पेमेंट पर्याय – पेटीएम वॉलेट, डेबिट आणि क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि BHIM यूपीआयद्वारे Paytm QR कोडवर पेमेंटला सपोर्ट करते. त्यामुळे फीचर फोन असणाऱ्या मर्चेंटला एसएमएस कन्फर्मेशनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. पेटीएमचा वापर करणाऱ्या दुकानदारांनी केवळ ग्राहकांच्या स्क्रीनशॉटवर अवलंबून न राहता वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून पैसे मिळाल्याचे तपासावे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3zx7roV