Full Width(True/False)

Photos- Penthouse मध्ये राहतात जॉन- प्रिया, दिसतो अरबी समुद्र

मुंबई- अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमने २००३ मध्ये 'जिस्म' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटात काम केलं. आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर आणि अथक मेहनतीने जॉनने सिनेसृष्टीत आपलं नाव भक्कम केलं. जॉन हा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक असून अभिनया व्यतिरिक्त तो इंडियन सुपर लीग फुटबॉलच्या नॉर्थ ईस्ट युनायटेड एफसीचाही मालक आहे. त्याचप्रमाणे तो गार्डियन हेल्थ केअरमध्ये पार्टनर आणि जी यू एस-आधारित आरोग्य पोषण GNC च्या भारतातील मुख्य फ्रँचायझीचा पार्टनर आहे. तसेच जॉन एका आलिशान पेंटहाउसचाही मालक आहे. जॉनचं हे डुप्लेक्स सी-फेसिंग घर वांद्रे पश्चिमेला आहे. या पेन्टहाउसचं नाव 'विला इन द स्काय' असं आहे. सातव्या आणि आठव्या मजल्यावर असलेलं हे घर ४ हजार स्क्वेअर फूट लांब आहे. जॉनचं हे सुंदर घर त्याचा पार्टनर एलेनने डिझाइन केलं आहे. त्यांनी दोन मजले एकत्र करून हा महाल उभा केला आहे. या घराबाबत बोलताना जॉनने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'तुमचं घर तुमच्याबद्दल सांगतं. त्यामुळे तुमचं घर तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप आहे का नाही याची खात्री करून घ्या.' जॉनच्या घरातून निशाशार समुद्र अतिशय सुंदर दिसतो. या अथांग समुद्राच्या लाटांचा अनुभव घेण्यासाठी जॉनच्या घरात टाइल्सपासून छतापर्यंत अनेक ठिकाणी काचा लावण्यात आल्या आहेत. एवढंच नाही तर मास्टर बेडरूमलाही काचा लावण्यात आल्या आहेत. समुद्राकडे पाहताना कोणताही अडथळा येऊ नये म्हणून या घराला मिनिमलिस्टिक लुक देण्यात आला आहे. तसंच घरात हवा खेळती रहावी म्हणून ओपन प्लॅनची योजना वापरली गेली आहे. घराला अल्ट्रा मॉडर्न लुक देण्यात आला आहे. जॉनच्या पेन्टहाउसमध्ये एक खासगी बाल्कनी आहे, जिथे तुम्हाला नैसर्गिक सुंदरता पाहायला मिळते. घरात एक झाकूजी आणि मास्टर बेडरूममध्ये एक स्पा बाथरूम आहे. घरात एक मीडिया रूमही आहे, ज्याला ब्लाइंड ग्लास लावण्यात आला आहे. या खास रूममध्ये अनेक चित्रपटांचं शूटिंग आणि स्क्रीनिंग करण्यात आलं आहे. दरम्यान, नुकताच आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जॉन आणि प्रियाचं लग्न २०१४ मध्ये झालं असून ती लाइमलाइटपासून लांब राहणंच पसंत करते. प्रिया रुंचाल एक आर्थिक विश्लेषक आणि इन्‍वेस्‍टमेंट बँकर आहे. ती अमेरिकेत राहत होती. प्रियाचा जन्म लॉस एन्जेलिसमध्ये झाला. प्रियाने तिचे शालेय शिक्षण अमेरिकेतूनच केलं. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर प्रियाने लंडनमधून एमबीए पूर्ण केलं. प्रियाचा जन्म आणि शिक्षण जरी अमेरिकेतच झालं असलं तरी तिच्या कुटुंबाची मुळे हिमाचल प्रदेशातील मॅक्लॉडगंज येथील आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qSXn5v