मुंबई- आपल्या जबरदस्त डान्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री फार कमी काळात यशस्वी झाली. तिच्या डान्सचे लाखो चाहते आहेत. तिला आजची डान्सिंग क्वीन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आतापर्यंत नोराने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत तर 'भुज : द प्राइड ऑफ इंडिया' चित्रपटात तिने अभिनयही केला आहे. नोरा बॉलिवूडमधील यशस्वी कलाकार असली तरी तिला हे यश मिळवण्यासाठी तिला खूप कष्ट करावे लागले. अनेकदा तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. नोरा या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असली तरी एक प्रसंग आहे जो आठवल्यावर आजही नोराला रडायला येतं. नोराने एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली होती. ही घटना ऐकून तुम्हालादेखील मोठा धक्का बसेल. बॉलिवूड अभिनेत्रींना त्यांच्या कपड्यांमुळे अनेकदा Oops मुमेंटचा सामना करवा लागतो. परंतु नोरासोबत घडलेला हा प्रकार त्यापेक्षाही मोठा आणि धक्कादायक होता. नोराने एका मुलाखतीत सांगितलं होतं एका शूटिंग दरम्यान ती डान्स करत असताना अचानक तिच्या ड्रेसने दगा दिला आणि स्टाफ समोर तिचा ड्रेस खाली सरकला, त्यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया देवासारखी धावत गेली आणि तिची मदत केली. नाहीतर सगळ्यांसमोर तिच्यावर नामुश्की ओढावली असती. याआधीही नोराला Oops मुमेंटचा सामना करावा लागला आहे. मात्र ही घटना आठवूनही तिच्या अंगावर आजही काटा येतो अस तिने सांगितलं. 'सत्यमेव जयते' या चित्रपटातील 'दिलबर दिलबर' या गाण्याने नोरा लोकप्रिय झाली. गाण्यातील तिच्या हटके डान्सने प्रेक्षक तिच्या प्रेमात पडले. नुकतेच तिच्या बादशाहासोबतचे 'कुसु कुसू' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याला चाहते चांगला प्रतिसाद देत आहेत. गायक गुरू रंधावा याच्या नवीन गाण्याच्या व्हिडिओमध्येही नोरा दिसली. या गाण्याच्या प्रमोशन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. तसेच काही दिवसांपूर्वी दोघंही इंडियाज बेस्ट डान्सर आणि द कपिल शर्मा शो मध्ये म्युझिक व्हिडिओच्या प्रमोशनसाठी गेले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नोराला करोनाची लागण झाली असून ती सध्या घरीच क्वारन्टीन आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3G5QQuO