मुंबई- इंडियन आयडलचा सूत्रसंचालक आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघांनी ही आनंदाची बातमी मॅटर्निटी शूटचे फोटो शेअर करत चाहत्यांना दिली. त्यांच्या या फोटोवर चाहते आणि कलाकार मित्र- मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आदित्यने फोट शेअर करत लिहिलं, 'तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी आणि श्वेता लवकरच माझ्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहोत. वाटतं बाळ फोटोत खुश दिसत आहे.' या फोटोत श्वेताना क्रॉप टॉप घातला आहे आणि बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. तर आदित्यही फोटोत खूप आनंदी दिसत आहे. श्वेताने देखील हाच फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली. श्वेताच्या पोस्ट खाली आदित्यने कमेंट केली आहे. 'माझी क्यूटी पाय आम्हाला आणखी एक क्यूट पाय देऊन आशीर्वाद देत आहे. आता अजून प्रतीक्षा करू शकत नाही.' २०२० मध्ये लग्न झालं आदित्य आणि श्वेता यांनी २०१० मध्ये शापित चित्रपटात काम केलं होतं. त्यावेळी त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आदित्य आणि श्वेता जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी १ डिसेंबर २०२० रोजी लग्न केलं. या दोघांनी मुंबईतील इस्कॉन मंदिरात कुटुंबिय आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्न केलं. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लग्नासाठी फक्त ५० लोकांना आमंत्रित करण्यात आलं होतं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबरला लग्नाचं रिसेप्शनही आयोजित करण्यात आलं होतं, ज्यामध्ये फक्त दोघांचे कुटुंबिय उपस्थित होते.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33OVXBB