नवी दिल्ली: लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने लाँच केला असून हा स्मार्टफोन ६ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. Realme 9i मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये, ५० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. सोबतच, समोर १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. Realme 9i ची किंमत आणि स्पेसिफिकेशनशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया. वाचा Realme 9i ची किंमत: व्हिएतनाममध्ये Realme 9i ची किंमत VND ६,२९०,००० (अंदाजे २०,५०० रुपये) आहे. हा स्मार्टफोन ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज पर्याय, प्रिझम ब्लॅक आणि प्रिझम ब्लू कलर पर्यायांमध्ये विकला जाईल. हा स्मार्टफोन भारतासह इतर प्रदेशात लाँच केला जाणार की नाही याबाबत कंपनीने अद्याप काही सांगितले नाही . दरम्यान, Realme 9i moniker अलीकडेच Realme India स्टोअरवर स्पॉट झाले होता, ज्यावरून हा फोन लवकरच देशात लाँच होऊ शकतो अशी अपेक्षा आहे. Realme 9i चे फीचर्स: Realme 9i ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 680 SoC पॅक करते. ६ GB LPDDR4X RAM आणि १२८ GB UFS 2.2 बिल्ट-इन स्टोरेजसह जोडलेले आहे. कंपनीच्या मते, यूजर्स इनबिल्ट स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवू शकतात. स्मार्टफोन ९० Hz च्या रीफ्रेश दर आणि ४८० nits च्या ब्राइटनेससह ६.६ -इंचाचा फुल-एचडी+ २,४०० x१०८० पिक्सेल) IPS LCD डिस्प्ले दाखवतो. Realme 9i ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह सुसज्ज आहे. ज्यामध्ये, फेज डिटेक्शन ऑटोफोकस (PDAF) सह ५०-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा,२ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा आणि २-मेगापिक्सेलचा समावेश आहे. मोनोक्रोम कॅमेरा. पोर्ट्रेट इमेजसाठी f/२.४ अपर्चर असलेला कॅमेरा आहे. स्मार्टफोन १६ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह येतो. Realme 9i ५,००० mAh बॅटरीने सुसज्ज आहे जी ३३ W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3feEg0t