Full Width(True/False)

Smart TV: घरीच घ्या थिएटरचा आनंद, ‘या’ कंपनीने लाँच केला ७५ इंच स्मार्ट टीव्ही; किंमत तब्बल...

नवी दिल्ली: ने भारतीय बाजारात आपला नवीन प्रीमियम टीव्ही लाँच केला आहे. कंपनीने ला सादर केले असून, या ७५ इंच टीव्हीमध्ये ४K HDR QLED स्क्रीन दिली आहे. डॉल्बी व्हिजन, ४० वॉटचे स्पीकर्स आणि गुगल वॉइस असिस्टेटंसह येणाऱ्या या टीव्हीची किंमत १,१९,९९९ रुपये आहे. या टीव्हीला फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता. वाचा: फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स टीव्हीमध्ये ३८४०x२१६० पिक्सल रिझॉल्यूशनसह ७५ इंच QLED 4K डिस्प्ले दिला आहे. यात दिलेली स्क्रीन MEMC टेक्नोलॉजी आणि १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येते. टीव्ही पाहताना डोळ्यांना त्रास होऊ नये यासाठी अँटी-ग्लेअर प्रोटेक्शन देखील दिले आहे. चारकोल ग्रे मेटल फ्रेमसह येणाऱ्या या टीव्हीत २ जीबी रॅम आणि १६ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. ६४-बिट क्वाड कोर प्रोसेसरसह येणारा हा टीव्ही अँड्राइड ११ ओएसवर काम करतो. यात गुगल प्ले स्टोरला देखील अ‍ॅक्सेस करू शकता. वीयूचा हा टीव्ही इन-बिल्ट क्रोमकास्ट आणि प्रीलोडेड नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार आणि युट्यूबसह येतो. यात कंपनीने अ‍ॅक्टिव्ह वॉइस रिमोट सपोर्ट दिला असून, याद्वारे ओटीटी अ‍ॅप्स आणि गुगल क्रोमकास्टला अ‍ॅक्सेस करण्यासाठी डेडिकेटेड बटन दिले आहे. टीव्हीमध्ये साउंडसाठी डॉल्बी एटमॉस आणि डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह ४० वॉट आउटपूटचे दोन मास्टर स्पीकर आणि दोन ट्वीटर आहेत. यात फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि इतर विंडोज व आयओएस गॅजेट्सच्या स्क्रीनला कास्ट करण्याची सुविधा मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल बँड वाय-फाय, ४ एचडीएमआय पोर्ट, एक ऑडिओ जॅक आणि दोन यूएसबी इनपूट दिले आहेत. लाईव्ह मॅचसाठी यात क्रिकेट मोड देखील आहे. या टीव्हीचे वजन २६.६ किलो आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GsOkyE