नवी दिल्ली : आज आपला नवीन Realme 9i ला भारतात लाँच करणार आहे. हे कंपनीच्या गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या चे सक्सेसर मॉडेल आहे. स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि ऑक्टाकोर क्वालकॉन स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर सारखे फीचर्स मिळतील. याशिवाय ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. फोनला दुपारी १२.३० वाजता ऑनलाइन लाँच केले जाईल. या इव्हेंटला कंपनीच्या फेसबुक आणि युट्यूब पेजवर लाईव्ह पाहू शकता. वाचा: Realme 9i ची संभाव्य किंमत या फोनला ४ जीबी रॅम आणि ६ जीबी रॅम अशा दोन व्हेरिएंटमध्ये सादर केले जाऊ शकते. रिपोर्टनुसार, फोनची किंमत जवळपास १५ हजार रुपये असू शकते. व्हिएतनाममध्ये ९आय ला आधीच लाँच करण्यात आले आहे. येथे फोनच्या ६ जीबी व्हेरिएंटची किंमत जवळपास २० हजार रुपये आहे. Realme 9i चे संभाव्य फीचर्स रिपोर्टनुसार, भारतात सादर केले जाणारे मॉडेल हे व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आलेल्या मॉडेलप्रमाणेच असेल. म्हणजेच, फोनमध्ये समान स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळू शकतात. स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फुलएचडी+ आयपीएस डिस्प्ले दिला जाईल. याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज असू शकतो. यात ६ जीबी रॅमसह स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर आणि दोन २ मेगापिक्सलचे सेंसर मिळू शकता. तर सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोनमध्ये पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GD5RnT