Full Width(True/False)

Free Wi-Fi:आता स्लो इंटरनेटची समस्या येणार नाही, 'असे' वापरा रेल्वे स्टेशनचे हाय स्पीड Wi-Fi मोफत, फॉलो करा या स्टेप्स

नवी दिल्ली: देशाला डिजिटल इंडिया बनविण्याच्या दिशेने सरकारने अनेक पावले उचलली आहेत. सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय उपलब्ध करून देणे हे त्यापैकीच एक. इंटरनेट आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज Google Inc. ने रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यासाठी रेल्वे टेलिकम्युनिकेशन कंपनी RailTel सोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत IRCTC प्रवाशांना आता RailTel द्वारे प्रदान केलेल्या नेटवर्कद्वारे जोडलेल्या प्रमुख मार्गांवर आणि रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सुविधा मिळू शकते. वाचा: अनेकदा, रेल्वे स्टेशनवर गेल्यावर नेटवर्क कमी जास्त होत असल्याचे दिसून येते. किंवा ते पूर्णपणे नाहीसे होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही लॅपटॉपच्या मदतीने ऑफिसचे काम करत असाल किंवा कुटुंबातील सदस्याशी बोलत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्हिडीओ कॉलिंग दरम्यान देखील नेटवर्कमुळे समस्या उद्भवतात. आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुम्ही रेल्वे स्टेशनवर अगदी सहजपणे मोफत वाय-फायचा आनंद घेऊ शकता आणि त्यासाठी तुम्हाला फक्त काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुमचा स्मार्टफोन रेल्वे वायफायशी जोडला जाईल आणि तुम्ही हायस्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकाल. रेल्वे स्थानकांवर मोफत वाय-फाय वापरायचे असल्यास फॉलो करा या स्टेप्स: सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनवर वायफाय सेटिंग्ज उघडा. उपलब्ध नेटवर्क शोधा. RailWire नेटवर्क निवडा. तुमच्या मोबाईल ब्राउझरवर railwire.co.in वेबपेज उघडा. आता तुमचा १० अंकी मोबाईल नंबर टाका. तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल. RailWire कनेक्ट करण्यासाठी हा OTP पासवर्ड म्हणून वापरा. आता तुम्ही Railwireशी यशस्वीरित्या कनेक्ट झाला आहात. मोफत इंटरनेट वापरण्यास सुरुवात करा. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3KkXNdW