Full Width(True/False)

Reliance Jio: मस्तच! Jio ची नवीन सर्व्हिस लाँच, आता दरमहिन्याला स्वतःहून रिचार्ज करण्याची गरजच नाही; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन सर्व्हिस लाँच केली आहे. या सर्व्हिसला नाव दिले आहे. कंपनीने या सर्व्हिसला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियासोबत मिळून सादर केले आहे. वाचाः ही एक प्रकारची पेमेंट सर्व्हिस असून, कंपनीचा दावा आहे की यूपीआय आधारित AutoPay सुविधा देणारी पहिलीच टेलिकॉम कंपनी आहे. जिओच्या या सर्व्हिसला पोस्टपेडसह प्री-पेड ग्राहकांसाठी देखील सादर केले आहे. काय आहे रिलायन्स जिओने यूपीआय आधारित ऑटोपे सर्व्हिसला ग्राहकांच्या सुविधेसाठी लाँच केले आहे. ग्राहकांना दरमहिन्याला रिचार्जची तारीख लक्षात ठेवावी लागते. तसेच, तारीख विसरल्यानंतर टेलिकॉम सर्व्हिस बंद होते. मात्र, जिओच्या नवीन यूपीआय ऑटोपे सर्व्हिसमुळे दरमहिन्याला रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. रिचार्जची तारीख देखील लक्षात ठेवावी लागणार नाही. रिचार्जची रक्कम आपोआप अकाउंटमधून वजा होईल. जिओ ग्राहक यूपीआय आधारित ऑटोपे सर्व्हिसचे निर्देश My अ‍ॅपमध्ये सेट करू शकतात. ग्राहकांना ५ हजार रुपयांपर्यंतच्या रिचार्जसाठी यूपीआय पिन द्यावा लागणार नाही. परंतु, ५००० रुपयांवरील रिचार्जसाटी यूपीआय पिन टाकावा लागेल. जिओ यूजर वेळोवेळी आपल्या प्लानला अपडेट देखील करू शकतील. चे चीफ ऑफ प्रोडक्ट ऑफिसर कुणाल यांनी माहिती दिली की, जिओसोबतची भागीदारी ग्राहकांच्या रिचार्ज रिचार्ज करण्याच्या अनुभवात मोठा बदल करेल. NPCI कडून जिओच्या ग्राहकांना पेमेंटसाठी अतिरिक्त सुरक्षा देखील मिळेल. त्यांचा दावा आहे की, यूपीआय आधारित ऑटोपे सर्व्हिस पूर्णपणे सुरक्षित आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3F2vH3o