Full Width(True/False)

अभिनेत्रीचं ३१ वर्षी निधन, कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

नवी दिल्ली- हॉलिवूडची प्रसिद्ध स्टार किम मी शूच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीने वयाच्या ३१ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. बुधवारी ५ डिसेंबर रोजी चं () आकस्मित निधन झालं. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेनंतर तिचं संपूर्ण कुटुंब दुःखात बुडालं आहे. किम मी शू वर तानेयुंग सुंगसिम फ्युनरल होम येथे अंत्यसंस्कार केले गेले. अभिनेत्रीच्या निधनाने कुटुंबासह लाखो चाहत्यांना दु:ख झाले आहे. कोरियन ड्रामा मध्ये ती सहाय्यक भूमिकेत दिसली होती. तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुकही झालं होतं. 'स्नोड्रॉप' हा १९८७ च्या लोकशाही समर्थक चळवळीच्या पार्श्वभूमीवरील एक रोमँटिक मेलोड्रामा आहे. किमचा जन्म १६ मार्च १९९२ रोजी दक्षिण कोरियात झाला. तिने कोरियन नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये शिक्षण घेतलं होतं. किमने अभिनयात करिअर केलं. ती २०१९ मध्ये 'मेमरीज' आणि 'क्यूंगमीज वर्ल्ड' या दोन चित्रपटांमध्येही दिसली होती. याशिवाय ह्युमन लुवाक या मालिकेत दिसली. याशिवाय तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्येही काम केलं आहे. Hi Bye, Mama! आणि Into the Ring मध्ये तिचा परफॉर्मन्स दिसला आहे. दरम्यान, कुटुंबियांकडून एक आवाहन करणारं ट्वीट करण्यात आलं. यात त्यांनी लिहिले की, किम आता आमच्यात नाही. तिच्या कुटुंबाला एकट्याला राहू द्या. त्यांनी चाहत्यांकडे प्रायव्हसीची मागणी केली आहे. तसेच कोणत्याही अफवांवर आणि तर्कांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन किमच्या कुटुंबीयांनी मीडियाला केलं. तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार, किमवर शांतपणे एकांतात अंत्यसंस्कार केले जातील. तिच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना आपण करुयात आहे. जेणेकरून धक्का बसलेल्या कुटुंबीयांना शांततेत मृतांचे स्मरण करता येईल. यासोबत किम मी शू यांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना. 'आम्ही विनंती करतो की खोट्या अफवा आणि तर्क करू नका जेणेकरुन शोकग्रस्त कुटुंबीयांना त्रास होणार नाही. तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार, अंत्यसंस्कार शांतपणे एकांतात केले जातील. तिच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना आपण करुयात', अस त्या स्टेटमेंटमध्ये लिहिलं होतं.किम मी सूच्या निधनाची बातमी खरी आहे कळताज सोशल मीडियावर तिचे फॅन्स शोक व्यक्त करत तिच्या आठवणी शेअर करू लागले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/33aiKqG