Full Width(True/False)

'दत्तक घेतलं म्हणून मुलीचा हात पकडत नाही,' सनी लिओनी झाली ट्रोल

मुंबई- मुलगी निशाचा हात सार्वजनिक ठिकाणी न धरल्यामुळे सनी लिओनीला ऑनलाइन ट्रोल करण्यात आलं, त्यानंतर तिचा पती तिच्या मदतीला धावून आला. त्याने लोकांच्या प्रतिक्रियांना 'निरर्थक' म्हटलं आणि निशाला कुटुंबाकडून चांगली वागणूक दिली जात नसल्याचा दावा फेटाळून लावला. अलीकडेच, पापाराझींनी शूट केलेल्या एका व्हिडिओमध्ये सनी तिच्या तीन मुलांसह- निशा, नोहा आणि आशेरसह पायऱ्यांवरून चालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सनी तिच्या दोन मुलांना नोहा आणि आशरला पकडून चालताना दिसत आहे तर निशा स्वतः पायऱ्या उतरताना दिसत आहे. त्यानंतर लोकांनी सनीवर आरोप करण्यास सुरुवात केली. लोकांनी सांगितले की, सनीने निशाला दत्तक घेतल्यामुळे ती तिची काळजी घेत नाही. युझर्सने केवळ दिखाव्यासाठी मुलगी दत्तक घेतल्याचं सांगितलं. सनीचा पती डॅनिअल वेबर पत्नीच्या बचावात उतरला आहे. एका मुलाखतीत डॅनिअलने हे सर्व आरोप खोडून काढले आणि म्हणाला की, 'अरे देवा, हे किती मूर्खपणाचं आहे, मला याबद्दल बोलायचंदेखील नाही. मला खरोखर याची पर्वा नाही की लोक काय विचार करतात.' डॅनियल म्हणाला, 'माझी मुल तीन वर्षांची आहेत आणि ते उद्यानात जंगली प्राण्यांप्रमाणे धावतात, तर माझी मुलगी सहा वर्षांची आहे आणि तिला कसं चालायचं हे माहीत आहे.' घरात निशाला चांगली वागणूक देत नाही, असे म्हणणाऱ्यांवरही डॅनिअलने संताप व्यक्त केला. डॅनिअल म्हणाला- 'ती माझ्या घरची राजकुमारी आहे. लोकांची अशी विचारसरणी असणं हे फारच हास्यास्पद आहे. सनी आणि डॅनिअलने २०१७ मध्ये महाराष्ट्रातील एका अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतलं होतं, निशा त्यावेळी दोन महिन्यांची होती. २०१८ मध्ये, हे जोडपं सरोगसीद्वारे नोहा आणि आशेर या जुळ्या मुलांचे पालक झाले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mYWcR1