नवी दिल्ली: टेलिकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. नुकतेच टेलिकॉम टॅरिफ आदेश जारी केला असून, यात टेलिकॉम प्रोव्हाइडर्सला २८ दिवसांऐवजी ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. टेलिकॉम कंपन्यांना ट्रायच्या नवीन आदेशांतर्गत ३० दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान नॉटिफिकेशन जारी झाल्यापासून ६० दिवसांच्या आत सादर करावे लागतील. वाचा: ट्रायच्या नवीन आदेशानुसार, प्रत्येक टेलिकॉम कंपन्यांनी कमीत कमी एक प्लान वाउचर, एक स्पेशल टॅरिफ वाउचर आणि एक कॉम्बो वाउचर असा सादर करायला हवा ज्याची वैधता २८ दिवसांऐवजी पूर्ण ३० दिवस असेल. ग्राहकांना या प्लान्सला पुन्हा रिचार्ज करायचे असल्यास, त्या ठराविक तारखेपासूनच करता येईल, अशी तरतूद हवी. ३० ऐवदी २८ दिवसांची वैधता काही दिवसांपूर्वी यूजर्सने तक्रार केली होती की, टेलिकॉम कंपन्या महिन्याभराचा पूर्ण रिचार्ज देत नाही. टेलिकॉम कंपन्या एका महिन्यात ३० दिवसांऐवजी २८ दिवसांच्या वैधतेसह येणारे प्लान्स देत आहेत. त्यानंतर आता ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना हे नवीन आदेश दिले आहेत. कमी दिवसांची वैधता देत असल्याचा आरोप खासगी टेलिकॉम कंपन्या जसे की , आणि (Vi) या एका महिन्याच्या रिचार्जच्या नावाखाली ३० ऐवजी २८ दिवसांची वैधता ऑफर करतात. ग्राहकांच्या मते कंपन्या दरमहिन्याला २ दिवस कपात करून वर्षभरात २८ दिवस वाचवतात. यामुळे वर्षभरात १२ ऐवजी १३ महिन्यांचे रिचार्ज करावे लागते. याच प्रमाणे दोन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ५४ किंवा ५६ आणि तीन महिन्यांच्या रिचार्जमध्ये ९० दिवसांऐवजी ८४ दिवसांची वैधता मिळते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3H9Peka