नवी दिल्ली : ची सर्वत्र चर्चा असून गेल्या महिन्यात, लेनोवोचे सरव्यवस्थापक चिन जिन यांनी कन्फर्म केले होते की, कंपनी तिसऱ्या पिढीच्या Razr स्मार्टफोनवर काम करत आहे. ज्यामध्ये क्लॅमशेल डिझाइन असेल. आता एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये, आगामी Razr 3 च्या काही वैशिष्ट्यांबद्दल माहिती देण्यात आली आहे. पाहा डिटेल्स. वाचा: Moto Razr 3 चे संभाव्य तपशील: टेक्निक्स रिपोर्टनुसार, आगामी फोल्डेबल फोन Razr 3 चे कोडनेम Maven आहे. या फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल, ज्याचा आस्पेक्ट रेशो २०: ९ असेल. या फोनमध्ये २८०० mAh ची बॅटरी उपलब्ध असेल. याशिवाय, युजर्सना स्मार्टफोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळू शकतो. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये ३२-मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. हा फोन Android १२ वर काम करेल. यापूर्वी समोर आलेल्या XDA रिपोर्टनुसार, Motorola Razr 3 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेट दिला जाऊ शकतो. याशिवाय, फोनमध्ये वाय-फाय, जीपीएस, ब्लूटूथ, हेडफोन आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर्स दिले जातील. Moto Razr 3 अपेक्षित किंमत आणि लाँच: Motorola Razr 3 च्या लाँच आणि किंमतीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, हा फोन जून २०२२ मध्ये लाँच केला जाऊ शकतो आणि त्याची किंमत ८०,००० ते १,००,००० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. Moto Razr २०२२ मध्ये लाँच करण्यात आला होता. या फोनची किंमत प्रीमियम रेंजमध्ये ठेवण्यात आली आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. पहिली ६.२ इंच लवचिक OLED HD+ स्क्रीन आहे. ज्याचे, स्क्रीन रिझोल्यूशन ८७६ x २१४२ पिक्सेल आहे. तर फोन फोल्ड केल्यानंतर त्याची स्क्रीन साइज २.७ इंच होते. त्याची स्क्रीन ६०० x ८०० पिक्सेल आहे आणि ४:३ आस्पेक्ट रेशो देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे फोनच्या स्क्रीनवर वॉटर रिपेलेंट स्प्लॅश प्रूफ नॅनो कोटिंग करण्यात आली आहे. ज्यामुळे, ते वॉटर रेझिस्टंट बनते. तसेच संरक्षणासाठी ३D गोरिल्ला ग्लास ३ वापरण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fdc0eI