गेल्या काही वर्षात स्मार्टफोन मार्केट पूर्णपणे बदलले असून आता चांगला फोन खरेदी करण्यासाठी फार पैसे खर्च करण्याची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणूनच गेल्या काही काळात बजेट सेगमेंटमध्ये येणाऱ्या फोनची विक्री वाढली आहे. आजकाल परवडणाऱ्या स्मार्टफोनमध्येही तुम्हाला जवळपास सर्व स्पेसिफिकेशन्स मिळतात, जे तुम्हाला महागड्या फोनमध्ये मिळतात. जर तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, आणि स्मार्टफोन खरेदीसाठी फार खर्च करायची तुमची इच्छा नसेल तर आज आम्ही तुम्हाला तुम्ही ८००० रुपयांपर्यंत कोणता स्मार्टफोन खरेदी करू शकता याबद्दल सविस्तर सांगणार आहो. या लिस्टमध्ये समाविष्ट असलेले Infinix, samsung, redmi, itel या कंपन्यांचे मोबाईल या रेंजमध्ये खरेदी करता येतात. विशेष म्हणजे या फोनची किंमत प्रत्येकालाच परवडेल अशी आहे. डिटेल्स पाहा आणि ठरवा तुमच्या बजेटमध्ये यापैकी कोणता स्मार्टफोन येतो ते.

Gionee Max Pro
Gionee Max Pro फोनमध्ये ३ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी यात ६००० mAH ची मजबूत बॅटरी उपलब्ध करून देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या फ्रंटला ८ -मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ६९९९ रुपये आहे.कमी किमतीत हा फोन एक चांगला पर्याय आहे.
Realme Narzo 50i
या फोनमध्ये २ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५ -इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सेल आणि समोर ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Amazon वर त्याची किंमत ७४९९ रुपये आहे.
Redmi 9A Sport:
या फोनमध्ये ३ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५३ इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस १३-मेगापिक्सल कॅमेरा आणि समोर ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. Amazon वर त्याची किंमत ७९९९ रुपये आहे.
Infinix Smart 5A
फोनमध्ये २ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५२ इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 5A मध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे आणि दुसरा डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या फ्रंटला ८ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ६९९९ रुपये आहे.
Samsung Galaxy A03:
या फोनमध्ये २ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५ -इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनच्या मागील बाजूस ८ मेगापिक्सेल आणि समोर ५ मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ७९९९ रुपये आहे.
Realme C21 Y
Realme C21Y: या फोनमध्ये ३ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५ -इंचाचा डिस्प्ले आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. Realme C21Y मध्ये फोटोग्राफीसाठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आणि २-२ मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे आहेत. फोनच्या पुढील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर त्याची किंमत ९४९९ रुपये आहे. परंतु, प्रीपेड व्यवहारांसह फोन ७९९९ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
Moto e7 Power
या फोनमध्ये २ GB RAM सह ३२ GB इंटरनल मेमरी आहे. फोनमध्ये ६.५१ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी moto e7 power मध्ये ५००० mAH बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या पुढील बाजूस ५ मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर फोनची किंमत ६९९९ रुपये आहे.
itel vision 2
: पॉवर बॅकअपसाठी यात ४००० mAH ची बॅटरी देण्यात आली आहे. itel vision 2 फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे आणि दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सेलचा आहे. फोनच्या फ्रंटला ८-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. बजेट युजर्ससाठी हा एक चांगला पर्याय आहे. Amazon वर त्याची किंमत ७२९९ रुपये आहे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3K21dls